Top Recommended Stories

Irfan Khan Death Anniversary : टेलिव्हीजन मालिका ते हॉलिवूड प्रेरणादायी होता इरफान खान यांचा प्रवास, जाणून घ्या रंजक गोष्टी

Irfan Khan Death Anniversary : आपल्या दमदार अभिनयामुळे अभिनेते इरफान खान (Irfan khan ) यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. एक ‘जिंदा दिल’ अभिनेता म्हणून इरफान यांची बोलीवूडमध्ये ( Bollywood ) ओळख होती. फक्त बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्ये ( Hollywood ) ही आपल्या अभिनयाच्या जोरावर इरफान प्रसिध्द होते.

Updated: April 29, 2022 4:51 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Irfan Khan Death Anniversary : टेलिव्हीजन मालिका ते हॉलिवूड प्रेरणादायी होता इरफान खान यांचा प्रवास, जाणून घ्या रंजक गोष्टी

Irfan Khan Death Anniversary : आपल्या दमदार अभिनयामुळे अभिनेते इरफान खान  (Irfan Pathan ) यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे. एक ‘जिंदा दिल’ अभिनेता म्हणून इरफान यांची बोलीवूडमध्ये ( Bollywood ) ओळख होती. फक्त बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्ये ( Hollywood ) ही आपल्या अभिनयाच्या जोरावर इरफान प्रसिध्द होते. आजच्या दोन वर्षापूर्वी या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. अशा या अभिनेत्याच्या पुण्यस्मरणानिमित्त ( Irfan Khan Death Anniversary ) जाणून घेवूया त्याच्या विषयी काही रंजक गोष्टी.

Also Read:

टेलिव्हीजनपासून झाली करिअरला सुरुवात

अभिनेते इरफान खान हे जयपूर जवळील टोंक येथील रहिवासी आहे. एम.ए. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1984 साली अॅक्टर बनण्यासाठी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे प्रवेश घेतला. त्यानंतर अभिनयाच स्वप्न उराशी बाळगून त्यांनी मुंबई गाठले. या ठिकाणी त्यांना ‘चाणक्य’, ‘भारत एक खोज’, ‘बनेगी आपनी बात’, ‘चंद्रकांता’ आदी मालिकांमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

You may like to read

दूधवाल्याच्या मुलीसोबत झाल होत पहिलं प्रेम

इरफान यांनी एका मुलाखतीदरम्यान संगितले होते की, त्यांना पहिल्यांदा प्रेम झालं ते एका दूधवाल्याच्या मुलीसोबत. ते दूध घेण्यासाठी फक्त दूधवाल्याच्या मुलीला बघण्यासाठी जात होते. मात्र त्यांना त्याचं हे पहिलं प्रेम मिळू शकले नाही. त्यानंतर नाशिब त्यांना दिल्ली येथील नेशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे घेवून गेले. याठिकाणी त्यांची भेट सुतापा सिकंदर यांच्याशी झाली. या भेटीनंतर दोघांमध्ये प्रेम होत नंतर दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. दोघांना दोन मुले आहेत.

पठाणाच्या घरी जन्माला ब्राह्मण

इरफान यांचा जन्म एका मुस्लिम पठाण परिवारात झाला. त्यांचे पूर्ण नाव साहबजादे इरफान आली खान आहे. त्यांचे वडील जगीरदार खान होते. त्यांचा टायरचा व्यवसाय होता. एका मुस्लिम परिवारात जन्म घेतला असला तरी इरफान हे शाकाहरी होते. त्यांनी कधीच मास खाल्ले नाही. त्यामुळे त्यांचे वडील नेहमीच गमतीने ‘पठाण परीवारत एक ब्राह्मण जन्माला आला’ असे म्हणत असत. याबाबत खुद इरफान यांनी एका मुलाखतीत संगितले होते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 29, 2022 5:30 AM IST

Updated Date: April 29, 2022 4:51 PM IST