Jacqueline Fernandez चे 'ते' फोटो झाले व्हायरल, जाणून घ्या कसे लीक होतात फोटो-व्हिडिओ?

स्मार्टफोनमध्ये आपले वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ ठेवतो आणि फोनला लॉक देखील करतो. पण तरी देखील..

Updated: January 12, 2022 8:28 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Jacqueline Fernandez चे 'ते' फोटो झाले व्हायरल, जाणून घ्या कसे लीक होतात फोटो-व्हिडिओ?

Jacqueline Fernandez Photo Leak: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील सूत्रधार सुकेश चंद्रशेखरमुळे (Sukesh Chandrashekhar) याच्यासोबत जॅकलिनचे नाव जोडण्यात आले आहे. जॅकलिन आणि सुकेशचा लव्ह बाईटचा (Love bite) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इतकेच नाही तर दोघांचेही अनेक फोटो आणि चॅट आता जगजाहीर झाले आहेत. या निमित्ताने आम्ही आपल्याला खास माहिती घेऊन आलो आहे. ती म्हणजे, अखेर फोटो-व्हिडिओ कसे लीक होतात?

Also Read:

स्मार्टफोनमध्ये आपले वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ ठेवतो आणि फोनला लॉक देखील करतो. आपल्या परवानगीशिवाय आपला खासगी डेटा कोणीही पाहू शकणार नाही, याबाबत आपण काळजी घेतो. परंतु आपली छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणा आपले मोठे नुकसान करू शकतो. अलिकडे डेटा लीक झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस देखील त्याला बळी पडली आहे. जॅकलिन फर्नांडिस आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील सूत्रधार सुकेश चंद्रशेखरचे (jacqueline fernandez with sukesh) प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. जॅकलिन आणि सुकेशचा लव्ह बाईटचा (Love bite) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खासगी फोटो-व्हिडिओ लीक होतात कसे? असा सवाल उपस्थित होत आहे.

चला तर मग जाणून घेऊ या स्मार्टफोनमधून खासगी फोटो आणि व्हिडिओ कसे लीक होतात?

सॉफ्टवेअरचा केला जातो असा वापर…

फोटो आणि व्हिडिओ लीक होण्यामागे संपूर्ण गेम ‘मॅलेशिय सॉफ्टवेअर’चा आहे. या सॉफ्टवेअरचा वापर करून कोणाच्याही स्मार्टफोनमधील खासगी गॅलेरीत प्रवेश केला जातो. डिव्हाइसवर वॉच ठेवला जातो. दरम्यान, आपण फोनमध्ये अॅप्स डाऊनलोड करताना हॅकरला फोनच्या गॅलरीत प्रवेश देण्याची परवानगी देतात. त्यानंतर फोनमधील फोटो आणि व्हिडिओचा मिसयूज होण्याची शक्यता जास्त असते.

Password Guessing

फोटो आणि व्हिडिओ लीक होण्यामागे Password Guessing हे देखील एक कारण असू शकते. काही हॅकर्स आपल्यावर काम लक्ष ठेऊन असतात. आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्या डिव्हाइसमधील खासगी डेटा त्यांच्या हाती लागतो आणि नंतर ते त्याचा मिसयूज करतात.

Password Guessing च्या माध्यमातून देखील फोटो आणि डेटा लीक होऊ शकतो. कोणतेही अकाउंट किंवा अॅप्स डाऊनलोड करण्यासाठी Password Guessing चा वापर केला जातो. त्यामुळे आपल्याला नेहमी पासवर्ड मजबूत करण्याचा सल्ला दिला जातो.

Social Engineering

Social Engineering देखील डेटा हॅक करण्याची एक फॉर्म्युला आहे. याचा वापर करून देखील हॅकर्स चांगल्या चांगल्यांचे अकाउंट्स हॅक करतात. Social Engineering चा वापर करून केवळ सिस्टमच नाही तर स्मार्टफोन देखील हॅक केला जातो. यूजर्सला त्याची माहितीही नसते. त्यानंतर यूजर्सचे खासगी फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक केले जातात. यासाठी हॅकर्स गूगल ड्राइव्ह, फोटोज, iCloud ला देखील टार्गेट करतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 11, 2022 2:38 PM IST

Updated Date: January 12, 2022 8:28 AM IST