Jacqueline Fernandez वर ईडीची मोठी कारवाई, 7 कोटींहून अधिक संपत्ती जप्त, जाणून घ्या काय आहे प्रकरण
Jacqueline Fernandez assets seized: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची 7.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात जॅकलिनच्या 7.12 कोटी रुपयांच्या एफडीचाही समावेश आहे. कॉनमन सुकेश चंद्रशेखरने कथित खंडणीतून वसलू केलेल्या 200 कोटी रुपयांपैकी 5.71 कोटी रुपये जॅकलीनला भेट म्हणून दिल्याचा आरोप ईडीने केला आहे.

Jacqueline Fernandez assets seized: बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठा धक्का दिला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (money laundering case) जॅकलीनलवर मोठी कारवाई करत ईडीने तिची 7.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त (Jacqueline assets seized) केली आहे. या अटॅच करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये जॅकलिनची (Jacqueline Fernandez) 7.12 कोटी रुपयांच्या फिक्स डिपॉझिट रक्कम देखील समाविष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. कॉनमन सुकेश चंद्रशेखर (Conman Sukesh Chandrasekhar) याने रॅनबॅक्सीचे माजी मालक शिविंदर सिंग (Shivinder Singh) यांच्या कुटुंबाकडून कथित खंडणी म्हणून वसलू केलेल्या 200 कोटी रुपयांपैकी 5.71 कोटी रुपये अभिनेत्रीला भेट म्हणून दिले होते असा आरोप ईडीने (Enforcement Directorate) आरोप केला आहे. हा व्यवहा झाला त्यावेळी चंद्रशेखर 2019 मध्ये मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात तुरुंगात होता.
Also Read:
एएनआयच्या वृत्तानुसार अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर अंमलबजावणी संचालनालयाची (ED) ही कारवाई तुरुंगात बंदिस्त गुन्हेगार सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात करण्यात आली आहे. शिविंदर सिंग यांची पत्नी अदिती सिंग यांच्या तक्रारीनंतर चंद्रशेखरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिविंदर सिंगच्या सुटकेच्या बदल्यात चंद्रशेखरवर मोठ्या रकमेची मागणी केल्याचा आरोप आदिती सिंग यांनी केला होता. जॅकलीन फर्नांडिसचे नाव ईडीच्या आधीच्या आरोपांसंदर्भात समोर आले होते.
Enforcement Directorate (ED) has attached assets worth Rs 7.27 crores of Bollywood actor Jacqueline Fernandez, in a money laundering case involving jailed conman Sukesh Chandrashekhar. The attached property is a fixed deposit: Sources
(File pic) pic.twitter.com/mQEZ8rkkju
— ANI (@ANI) April 30, 2022
चंद्रशेखरने बॉलिवूड अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनाही मोठी रक्कम दिल्याचे केंद्रीय एजन्सीला आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला भेट म्हणून हिरे, दागिने, 52 लाखांचा घोडा यासह अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. हे सर्व पैसे त्याने खंडणी उकळून कमावले होते. एक वर्षापासून ईडी या प्रकरणाचा तपास करत असून जॅकलीनला अनेकदा चौकशीला समारे जावे लागले आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या