विवाहित महिलेच्या प्रेमात पडले होते Jagjit Singh, फक्त 30 रुपयांत केलं होतं लग्न!
Jagjit Singh Birth Anniversary : जगजीत सिंग पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत राहिले होते. त्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहित असलेल्या गोष्टी घ्या जाणून...

Jagjit Singh Birth Anniversary : जगजीत सिंग (Jagjit Singh) हे असे नाव आहे जे शतकानुशतके स्मरणात राहील. सुंदर आवाजाने प्रेक्षकांना वेड लावणारे जगजित सिंग आज आपल्यात नाहीत पण त्यांच्या गझल लोकांच्या हृदयात आणि मनात सदैव जिवंत राहतील. गझल सम्राट म्हणून प्रसिद्ध झालेल्या जगजित सिंग यांची आज जयंती (Jagjit Singh Birth Anniversary). जगजीत सिंग यांच्या वडिलांचे नाव अमरसिंह धीमान आणि आईचे नाव सरदारणी बच्चन कौर होते. जगजीत सिंग यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1941 रोजी राजस्थानमधील श्री गंगानगर येथे झाला. आपल्या आध्यात्मिक आवाजाने लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या जगजीत सिंग यांना संगीताचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. ‘होठों से छू लो तुम’, ‘झुकी झुकी सी नजर’, ‘होश वालों को खबर क्या’, ‘चिट्ठी न कोई संदेश’, ‘ये दौलत भी ले लो’ अशा असंख्य गझल आणि नजमांनी जगजीत सिंग अजरामर झाले आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही तुम्हाला त्यांच्या जीवनाशी संबंधित काही खास आणि रंजक गोष्टी (Unknown Facts about Jagjit Singh) सांगणार आहोत. ज्या कदाचित तुम्हाला आतापर्यंत माहित नसतील. जगजीत सिंग पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत राहिले होते.
Also Read:
- Web Series: 'जलेबी बाई'मध्ये अभिनेत्रीनं मदकतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, दिले इंटीमेट सीन्स
- Disha Patani Latest Bikini Pics: दिशा पाटनी पुन्हा एकदा बिकिनी अवतारात चाहत्याच्या भेटीला, दिल्या किलर पोझ
- Happy Birthday Ritesh Deshmukh: रितेशला पाहाताच जेनेलिया म्हणाली होती, मुख्यमंत्र्यांचा मुलगा.. मग खूप गर्विष्ठ असेल!
जगजीत सिंग बद्दल खूप कमी लोकांना माहित आहेत या गोष्टी –
– फार कमी लोकांना माहिती आहे की जन्मानंतर गझल सम्राट जगजीत सिंग यांचे नाव जगमोहन होते. पण नंतर त्यांच्या शीख वडिलांनी त्यांच्या गुरूंच्या सल्ल्यानुसार त्यांचे नाव बदलून जगजीत सिंग ठेवले.
– जगजीत सिंग यांनी ऑल इंडिया रेडिओ (AIR) जालंधर स्टेशनवरून गायन आणि संगीत रचना करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
– जगजीत सिंग यांना मुंबईत आल्यानंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. पोट भरण्यासाठी त्यांनी छोट्या संगीत सभा आणि घरगुती कार्यक्रमात गाणी गायली. चित्रपटांमध्ये ब्रेक मिळेल या आशेने ते चित्रपट पार्ट्यांमध्ये गाणीही गात होते.
– जगजीत सिंग यांच्यासाठी सत्तरचे दशक चांगले होते. याच दशकात त्यांचा पहिला अल्बम ‘अनफर्गेटेबल्स’ रिलीज झाला.
– जगजीत सिंग यांनी 1994 मध्ये “आविष्कार” चित्रपटातील “बाबुल मोरा नायहार” या गाण्याने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली.
– चित्रा यांनी जगजीत सिंगसोबत दुसरे लग्न केले होते हे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांचे पहिले लग्न डेबू प्रसाद दत्ता यांच्यासोबत झाले होते. डेबू यांच्यापासून त्यांना एक मुलगी मोना होती.
– जगजीत सिंग आणि चित्रा यांचा विवाह अवघ्या 30 रुपयांमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे. तबला वादक हरीश यांनी त्यांच्या लग्नाची सर्व व्यवस्था केली होती.
– जगजीत आणि चित्रा यांना एक मुलगाही झाला. पण 1990 मध्ये त्यांचा मुलगा विवेकचा वयाच्या 18 व्या वर्षी कार अपघातात मृत्यू झाला. या अपघाताने दोन्ही तुटले. या धक्क्यानंतर चित्रा यांनी बराच वेळ गाण्यापासून अंतर राखले होते. तर जगजीत साहेबांनी बराच वेळ बोलणे बंद केले होते.
– 2005 मध्ये जगजीत सिंग यांना दिल्ली सरकारने गालिब अकादमी पुरस्काराने सन्मानित केले होते. तर भारत सरकारने 2003 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
– 2014 मध्ये भारत सरकारने जगजित सिंग यांच्या सन्मानार्थ एक स्मारक टपाल तिकीट जारी केले.
– 10 ऑक्टोबर 2011 रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात भारताने जगजित सिंग यांच्या रूपातील एक उत्कृष्ट गायक गमावला.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या