Top Recommended Stories

Kajol Tests Positive For Covid-19: बॉलिवूड अभिनेत्री काजोल कोरोना पॉझिटिव्ह, म्हणाली - 'मला माझे लाल नाक…'

Kajol Tests Positive For Covid-19 : काजोलने काही वेळापूर्वीच इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.

Published: January 30, 2022 12:55 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Kajol tests positive for Covid-19
Kajol tests positive for Covid-19

Kajol tests positive for Covid-19 : देशात कोरोना विषाणूने (Corona Virus) पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. सामान्य माणसांपासून ते चित्रपट सेलिब्रिटिपर्यंत अनेकांना कोरोनाची (Covid-19) लागण होत आहे. बॉलिवूड जगातही (Bollywood World) कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आता बी टाऊनमधील (B-Town) प्रसिद्ध अभिनेत्री काजोलला (Actress Kajol) कोरोनाची लागण झाली आहे. काजोलने सोशल मीडियावर पोस्ट (Social Media) करत कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले.

Also Read:

View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

You may like to read

काजोलने काही वेळापूर्वीच इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह (Kajol Tests Positive for Covid-19) आल्याचे सांगितले आहे. या पोस्टमध्ये काजोलने आपली मुलगी न्यासाचा फोटो शेअर करत तिची आठवण येत असल्याचे सांगितले आहे. काजोलच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटी फ्रेंड्सनी कमेंट्स करत काळजी घेण्यास सांगितले आहे.

काजोल इन्स्टाग्राम पोस्टमध्ये (Kajol Instagram Post) म्हणाली की, ‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मला माझे लाल नाक कोणालाही दाखवायचे नाही. त्यामुळे मला जगातील सर्वात गोड हसणे शेअर करणे योग्य वाटले. मिस यू न्यासा देवगण.’ काजोलच्या या पोस्टवर प्रियांका चोप्रासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत.

काजोल ही नव्वदच्या दशकातील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोलने वयाच्या 16व्या वर्षी तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. तिचा पहिला बॉलिवूड डेब्यू चित्रपट ‘बेखुदी’ होता. काजोलने तिच्या आतापर्यंतच्या चित्रपट प्रवासात सहा फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Award) जिंकले आहेत. काजोलने रेवती दिग्दर्शित ‘द लास्ट हुर्रे’ साइन केला आहे. दरम्यान काजोलची मुलगी न्यासा सध्या सिंगापूरच्या ग्लायॉन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचे शिक्षण घेत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 30, 2022 12:55 PM IST