मुंबई: एरव्ही दुसऱ्यांच्या पोस्टवर कमेंट करून नेहमीच वादात राहणारी बॉलिवूड एक्ट्रेस कंगना रनौत (Kangana Ranaut) आता टीकेची धनी झाली आहे. कंगनाच्या ट्रान्सपरन्ट ब्रालेटमधील बोल्ड लूकनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. कंगनानं (Kangana Ranaut) नुसतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोत कंगना अत्यंत तोकड्या कपड्यात दिसत आहे. त्यावरून कंगनाला ट्रोल केलं जातं आहे.Also Read - The Incarnation- SITA: करीना कपूर नाही तर बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत साकारणार 'सीता'ची भूमिका

कंगना सध्या विदेशात असून ती ‘धाकड’ चित्रपटाच्या शूटिंगच्या कामात बिझी आहे. कंगनानं इंस्टाग्रामवर धाकड रॅपअप पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये कंगनानं ट्रान्सपरन्ट ब्रालेट परिधान केलं आहे. त्यामुळे कंगना सध्या चर्चेत आली आहे. Also Read - Kangana Ranaut Bold Photo: ब्रालेटनंतर स्विमसूटमध्ये दिसली कंगना राणावत, वॉटर पार्कमध्ये दाखवला बोल्ड अंदाज!


कंगनानं (Kangana Ranaut) पार्टीत व्हाइट कलरची ट्रान्सपरन्ट ब्रालेट आणि हाय वेस्ट पँट परिधान केली होती. सोबतच तिनं गळ्यात गोल्डन चेन घालून लुक कंप्लीट केला आहे. फोटोत कंगना खूप आकर्षक दिसते आहे. इतकंच नाही तर कंगनानं फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘मोहब्बत में नहीं है फर्क जीने और मरने का, उसी को देखकर जीते हैं जिस काफिर पे दम निकले.’ही गालिबची शायरी लिहिली आहे. Also Read - Kangana Ranaut Corona Positive: कंगाना रानौतला कोरोनाची लागण, इन्स्टावर पोस्ट करत दिली माहिती


दरम्यान, आतापर्यंत कंगनानं अनेक अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरुन चिमटे काढले आहेत. मात्र, आता कंगना तिच्या बोल्ड लूकवरून ट्रोल होत आहे.