मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) ‘द कपिल शर्मा शो’चं (The Kapil Sharma Show) तिसरं सीझन लवकरच सुरू होणार आहे. कोरोना दरम्यान शो चालू होता परंतु कपिल (Kapil Sharma) जेव्हा दुसऱ्यांदा वडील झाला तेव्हा त्याने काही महिने हा शो बंद केला आणि आता पुन्हा हा बहुचर्चित शो (The Kapil Sharma Show) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.Also Read - Upasana Singh Birthday : दूरदर्शनवर वयाच्या 7 व्या वर्षीच सुरु केला होता अभिनय, असा आहे उपासना सिंह यांचा प्रवास

कपिल शर्मा (Kapil Sharma) या वेळी ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) एका नव्या शैलीत घेऊन येणार असून यासाठी संपूर्ण टीम पूर्णपणे सज्ज आहे. या सीझनसाठी कपिलने आपलं मानधन वाढवल्याच्याही बातम्या समोर येत आहेत. रिपोर्टनुसार हा शो होस्ट करण्यासाठी कपिल (Kapil Sharma) याआधी प्रत्येक भागासाठी 30 लाख रुपये मानधन घेत होता. मात्र आता त्याने हे मानधन वाढवून प्रत्येक भागासाठी 50 लाख रुपये केले आहे. त्यामुळं कपिल (Kapil Sharma Fees) आता एका आठवड्यासाठी 1 कोटी रुपये मानधन घेणार आहे. मात्र, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. Also Read - Kapil Sharma Fees: तुम्हाला हसवून कपिल शर्माने कमावला बक्कळ पैसा, मानधन ऐकूण बसणार नाही विश्वास

21 जुलैपासून शो प्रसारित होणार!

दरम्यान, ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा प्रसारित होणार याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु अशा बातम्या आहेत की, शोची संपूर्ण टीम (The Kapil Sharma Show Team) सातत्याने शूटिंग करत आहे आणि संपूर्ण जोमाने तयारीस लागली आहे. सर्व काही व्यवस्थित चालू राहिले तर कपिल (Kapil Sharma) आपला ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा 21 जुलैपासून पुन्हा प्रसारित करू शकतो. Also Read - Sumona Chakravarti Birthday: अमीर खानसोबत सुमोनाने करिअरला केली सुरुवात, गंभीर आजाराने त्रस्त असूनही चाहत्यांना भरभरून हसवते

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

सर्वाधिक टीआरपी शो

विकेंडला शनिवारी आणि रविवारी प्रदर्शित होणारा ‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला होता. या शोला विकेंडमध्ये सर्वोच्च टीआरपी होती. या शोचे मुख्य आकर्षण स्वत: कपिल शर्मा आहे. कपिलचे मजेशीर प्रश्न-उत्तरे, प्रसंगानुरुप तात्काळ मजेशीर प्रतिक्रिया यामुळे हा शो प्रचंड गाजला. त्यामुळं या शोमध्ये तो सर्वाधिक मानधन घेतो यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. आता त्याने मानधन वाढवल्याच्या बातम्या आहेत मात्र त्याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच या कार्यक्रमातील इतर कलाकार देखील लाखो रुपये कमवतात. मात्र त्यांच्या मानधनाचा अधिकृत तपशील अद्याप कळू शकलेला नाही.