Top Recommended Stories

'यश'च्या यशाची गोष्ट : KGF अभिनेता Yash चे वडील होते बस कंडक्टर, बालपणापासूनच स्वत:ला समजायचा हिरो

KGF Hero Yash's Real Name Aand story: KGF-2 चित्रपटामुळे अभिनेता यश चांगलाच चर्चेत आला आहे. यशच्या केजीएफने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र इथपर्यंतचा त्याचा प्रवास संघर्षमय होता. यशचा जन्म जन्म एका गरीब कुटुंबात झाला.

Published: April 27, 2022 3:35 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

'यश'च्या यशाची गोष्ट : KGF अभिनेता Yash चे वडील होते बस कंडक्टर, बालपणापासूनच स्वत:ला समजायचा हिरो
KGF Hero Yash's Real Name Aand story

KGF Hero Yash’s Real Name Aand story: कष्ट आणि धाडस यांना नशीबाची साथ मिळाली तर माणसामध्ये आकाशाला गवसणी घलण्याची क्षमता येते. याचे उदाहरण म्हणजे साऊथ चित्रपटांमधील सुपरस्टार अभिनेता यश. KGF-2 चित्रपटामुळे अभिनेता यश चांगलाच चर्चेत आला आहे. यशच्या केजीएफने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र रील लाईफमधल्या या सुपरस्टारचा इथपर्यंतचा प्रवास (KGF Hero Real story) सोपा नव्हता. यशचे खरे नाव (KGF Hero Real Name) नवीन कुमार गौडा हे आहे. त्याची आई त्याला यश या नावाने हाक मारायची आणि हेच नाव त्याने चित्रपटसुष्टीत प्रवेश करताना निवडले. देशात आणि जगभरात आपल्या चित्रपटाच्या यशाचा झेंडा रोवणाऱ्या यशचे आयुष्य नेहमीच असे नव्हते. त्याचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. घराचा खर्च भागवण्यासाठी यशचे वडील कंडक्टरचे (Yash’s father was a bus conductor) काम करायचे.

चित्रपटात काम करण्याचे पाहिले स्वप्न

यशला लहानपणापासूनच फिल्मी दुनियेत काम करण्याची इच्छा होती. सुरुवातीला त्याच्या पालकांनी ते गांभीर्याने घेतले नाही. मग एक दिवस यशला चित्रपटाच्या सेटवर काम करायला परवानगी दिली. दिले. एक-दोन दिवसांत त्याला कळेल आणि तो घरी परत येईल असे त्यांना वाटले. पण असे झाले नाही. ज्या चित्रपटासाठी यशला सहाय्यक दिग्दर्शकाची नोकरी मिळाली तो चित्रपट दोनच दिवसांत बंद झाला. त्यावेळी यशकडे राहायला जागा देखील राहीली नव्हती. पण हिम्मत न हारता तो एका थिएटर ग्रुपमध्ये सामील झाला.

You may like to read

प्रसिद्ध नाटककार बीवी कारंथ यांच्यासोबत केले काम

थिएटर ग्रुपमध्ये काम करत असतानाच त्याची ओळख प्रसिद्ध नाटककार बीवी कारंथ यांच्याशी झाली. यशने त्यांच्यासोबत बराच काळ काम केले. हळूहळू यशने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आणि कॅमेऱ्यासमोर दिसू लागला. यश म्हणाला की त्याने कधीही प्लॅन बी बनवला नाही. त्याला नेहमी वाटायचे की तो हिरो आहे. लहानपणापासून तो स्वतःकडे हिरो म्हणूनच पाहात होता. शाळेतही तो एक्‍स्‍ट्रा कर‍िकुलर अॅक्‍ट‍िव्हिटीमध्ये भाग घेत असे. त्याला लोकांचे एक्‍स्‍ट्रा अटेन्शन आणि टाळ्यांची सवय झाली होती.

2008 साली मिळाले रॉकी नाव

2008 मध्ये यशला रॉकी नावाची मुख्य भूमिका मिळाली. पण यश इथेच थांबला नाही. त्यांनी कन्नड चित्रपट उद्योगातील सर्व स्टेक होल्डर्ससह संपूर्ण चित्रपट उद्योगाला केवळ कन्नड प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी काम करण्यास सुरुवात केली आणि त्याचा परिणाम म्हणून आज KGF ने देश आणि जगभरातील बाजारपेठेत चांगली कमाई केली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 27, 2022 3:35 PM IST