Top Recommended Stories

'KGF Chapter- 2'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, 14 एप्रिलला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

KGF Chapter 2 Trailer Released: यशचा लूक पाहून आधीपासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहेच. त्यात आता या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांना या चित्रपटाची जास्तच उत्सुकता लागली आहे ते हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची वाट पाहत आहेत.

Updated: March 28, 2022 1:52 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

KGF Chapter 2
KGF Chapter 2

KGF Chapter 2 Trailer Released: साऊथ चित्रपटसृष्टीचा (South Film Industry) सुपरस्टार यशचा (Actor Yash) आगामी चित्रपट केजीएफ चॅप्टर 2चा (KGF Chapter 2) ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. 2 मिनिटे 56 सेकंदांचा हा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडला. यशचा लूक पाहून आधीपासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहेच. त्यात आता या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांना या चित्रपटाची जास्तच उत्सुकता लागली आहे ते हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची वाट पाहत आहेत. ट्रेलर पाहून आणि प्रेक्षकांमधील उत्साह पाहून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) नवीन रेकॉर्ड करेल असे म्हटले जात आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरमधील यशची एक्शन स्टाइल सोशल मीडियावर आधीच चर्चेत आली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाच्या ट्रेलरमधून (KGF Chapter 2 Trailer Released) यशसोबत संजय दत्त (Sanjay Dutta), श्रीनिधी शेट्टी (Shrinidhi Shetty), रवीना टंडन (Raveena Tandon), प्रकाश राज (Prakash Raj) आणि मालविका अविनाश (Malvika Avinash) यांचीही देखील जबरदस्त झलक पाहायला मिळत आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर खूप चांगले व्ह्यूज मिळत आहेत. 27 मार्चला बंगळुरु येथे या चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर लाँच इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये या चित्रपटातील सर्व सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 14 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

You may like to read

KGF 2च्या ट्रेलरमध्ये पूर्वीपेक्षा जास्त एक्शन, जबरदस्त संवाद आणि धमाके पाहायला मिळत आहे. रिलीज होताच KGF 2चा ट्रेलर व्हायरल होत आहे. KGFमध्‍ये गरूणाला मारल्‍यानंतर काय झाल्‍याने ट्रेलरची सुरुवात होते. यामध्ये यशचे अनेक एक्शन सीक्वेन्स दाखवण्यात आले आहेत. ट्रेलरमध्ये फक्त यशच नाही तर संजय दत्तचा लूकही खूपच जबरदस्त आहे. होमबॉल फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रशांत नील लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.