मुंबई : बॉलिवूडच्या (Bollywood) सुंदर, हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये कियारा आडवाणीचे (actress kiara advani) नाव घेतले जाते. कियाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. लवकरच कियारा आगामी चित्रपट (Bollywood Movie) ‘शेरशाह’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कियारा आडवाणी आज आपला 29 वा वाढदिवस (happy birthday Kiara Advani) साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्या आयुष्याशी संबंधित खास गोष्टी जाणून घेणार आहोत…Also Read - Urvashi Rautela Learning Martial Arts: उर्वशी रौतेला घेतेय मार्शल आर्टची ट्रेनिंग, व्हिडिओ पाहून म्हणाल 'अप्रतिम'

सलमानच्या सांगण्यावरुन बदलले नाव –

कियारा आडवणीचा जन्म (kiara advani birthday) 31 जुलै 1992 साली मुंबईत झाला. कियारा एका बिझनेसमन फॅमिलीत जन्माला आली आहे. कियारा आडवाणी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी दुसऱ्या नावाने ओळखली जात होती. तिचे खरे नाव आलिया आडवाणी होते. बॉलिवूडमध्ये आधीपासूनच या नावाची अभिनेत्री म्हणजेच आलिया भट (Alia Bhat) आहे. अशामध्ये सलमान खानने तिला नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. Also Read - Bigg Boss Season 15: बिग बॉस सीझन 15साठी सलमान खानने घेतले ऐवढं मानधन, आकडा ऐकून व्हाल थक्क!

चित्रपटात येण्यापूर्वी शिक्षिका होती कियारा –

कियाराचे शालेय शिक्षण आणि कॉलेज (Kiara advani Education) मुंबईमध्येच पूर्ण झाले आहे. कियाराच्या आजीने तिला वर्क एक्सपिरियन्स वाढवण्यासाठी टिचिंग करण्याचा सल्ला दिला होता. कियाराला मुलांना शिकवायाला खूप आवडत होते आणि ती कुलाबाच्या (Kulaba) अर्ली बर्ड स्कूलमध्ये (Arly Bird School) शिकवायला जात होती. याठिकाणी कियाराची आई हेडमास्टर होती. Also Read - Riteish Dekhmukh Video: रितेश देशमुखने मजेशीर व्हिडिओ केला शेअर, म्हणाला- ‘माझी पत्नी मला देव समजते पण जेव्हा…’

सुपरहिट चित्रपटात केलेय काम –

2016 मध्ये कियारा आडवाणीने नीरज पांडे (Niraj Pande) दिग्दर्शित ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोर’ या चित्रपटात (MS Dhoni Movie) काम केले. या चित्रपटातील कियाराच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. या चित्रपटानंतर कियारा आडवाणी एकापाठोपाठ एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 2019 मध्ये कियाराचे दोन चित्रपट ‘कबीर सिंग’ (Kabir Singh Movie) आणि ‘गुड न्यूज’ (Good News Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आले. चित्रपटांव्यतिरिक्त कियारा आडवाणीने म्युजिक अल्बम आणि वेब सीरिज ‘लस्ट स्टोरीज’ आणि ‘गिल्टी’मध्ये काम केले आहे.