इंटरनॅशनल स्टार किम कार्दशियन तिच्या बोल्ड अंदाजामुळेच जास्त ओळखली जाते. सोशल मीडियावर ती फोटो शेअर करते तेव्हा तिचे लाखो चाहते घायाळ होतात. रियालिटी टीव्ही स्टार आणि बिझनेस वूमन किम सध्या इंस्टाग्रामवर खूप एक्टीव्ह आहे. किमनं टेनिस खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये किमनं बिकिनी परिधान केली आहे.
Also Read - Kim Kardashian ने शेअर केली बेडरूममधील 'राज की बात'; म्हणाली, वयाच्या 40 नंतर...

फोटोमध्ये किमचा बिकनी लूक चाहत्यांना घायाळ करत आहे. किमचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. किमनं फोटोखाली “टेनिस एनीवन ?” असं कॅप्शन दिलं आहे.

किमनं एका मुलाखतीत सांगितलं होतं, की तिची मुलं अजून लहान आहेत. मुलं थोडी मोठी झाल्यानंतर सेक्सी सेल्फी घेणं बंद करेल. ‘मी एक निर्लज्ज आई आहे, असं म्हणण्याची वेळ मी येऊ देणार नाही, सेल्फी घेण्याच्याही काही मर्यादा असतात, असंही किमनं सांगितलं होतं.