Lata Mangeshkar Covid Positive: लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ICU मध्ये उपचार सुरू

सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Updated: January 12, 2022 1:35 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Lata Mangeshkar Covid Positive: लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ICU मध्ये उपचार सुरू
लता मंगेशकर

Lata Mangeshkar Hospitalized after contracting Covid: सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Singer Lata Mangeshkar)यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (bridge candy hospital Mumbai) दाखल करण्यात आले आहे. लता मंगेशकर (Lata Mangeshkar Health updates) या 92 वर्षीच्या असून त्यांना निमोनिया झाला आहे. खबरदारी म्हणून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.

Also Read:

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्याचे वय आणि प्रकृती पाहाता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती लता मंगेशकर यांची भाची रचना हिने दिली आहे. डॉ. प्रतीत समदानी आणि त्यांचे पथक लतादीदींच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लतादीदींच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. लतादीदींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापौर यांनी दिली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. लतादीदी लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी आमची इच्छा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून सांगितले आहे.

यापूर्वी देखील केले होते दाखल…

लतादीदींना यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. लतादीदींना व्हायरल इन्फेक्शन झाले होते, अशी माहिती त्यांची धाकटी बहीण उषा मंगेशकर यांनी दिली होती.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 11, 2022 3:22 PM IST

Updated Date: January 12, 2022 1:35 PM IST