Lata Mangeshkar dies: एका सुरेल युगाचं अंत! 'या' गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी तब्बल 8 तास उभ्या होत्या लता मंगेशकर
लतादीदींनी 'रंग दे बसंती' (rang de basanti) चित्रपटासाठी 'लुका छुपी बहूत हुई...' (luka chuppi Songs) हे गीत गायले होते. त्यावेळीचा एक किस्सा आम्ही आपल्याला सांगणार आहोत. प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमान यांनी संगीतबद्ध केलेला 'रंग दे बसंती' मधील 'लुका छुपी बहूत हुई...' हे गाणे लतादीदींनी गायले आहे.

Lata Mangeshkar dies: स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Legendary Singer Lata Mangeshkar) यांच्या दु:खद निधनामुळे पार्श्वगायन आणि संगीत क्षेत्रातील एका सुरेल युगाचा अंत झाल्याची शोकभावना व्यक्त होत आहे. लता मंगेशकर (Lata Mangeshkar News) यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास (Lata Mangeshkar dead) घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. लतादीदींनी आपल्या मधुर आवाजाने देशातीलच नाही तर विदेशातील श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मनोरंजन क्षेत्रासाठी त्यांनी भरभरून योगदान दिले. लतादीदी आपल्यात नाहीत, यावर अनेकांचा विश्वासच बसत नाही आहे. परंतु त्या गेल्या असल्या तरी त्यांची गाण्यातून त्या अजरामर राहाणार आहेत.
Also Read:
लतादीदींनी ‘रंग दे बसंती’ (rang de basanti) चित्रपटासाठी ‘लुका छुपी बहूत हुई…’ (luka chuppi Songs) हे गीत गायले होते. त्यावेळीचा एक किस्सा आम्ही आपल्याला सांगणार आहोत. प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमान यांनी संगीतबद्ध केलेला ‘रंग दे बसंती’ मधील ‘लुका छुपी बहूत हुई…’ हे गाणे लतादीदींनी गायले आहे. ए.आर.रहमान यांनी हे गाणे कंपोज केले होते तर प्रसून जोशी यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले होते. हे गाणे सुपरहिट झाले होते. आजही ते आवडीने ऐकले जाते. या गाण्यासाठी लतादीदींनी खूप मेहनत घेतली होती. गाण्याची बरेच दिवस रिहर्सल चालली. अखेर रेकॉर्डिंग सुरू होते तेव्हा लतादीदी तब्बल 8 तास एकाच ठिकाणी उभ्या होत्या. याबाबतचा खुलासा खुद्द चित्रपटाचे निर्माते राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये केला होता. ते म्हणाले होते, लता मंगेशकर त्यासाठी चेन्नईला आल्या होत्या. स्टुडिओमध्ये या गाण्याचे रिहर्सल सुरू होते. लतादीदींसाठी पिण्यासाठी पाणी, खाण्याचे पदार्थ आणि बसण्यासाठी खूर्ची ठेवण्यात आली होती. मात्र, लतादीदींनी काही खाल्लं नाही. त्या सलग गाण्याची रिहर्सल करत होत्या. त्या तब्बल 8 तास एकाच ठिकाणी उभ्या होत्या.
दरम्यान, लता मंगेशकर यांनी 1000 हून अधिक हिंदी आणि 36 प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. 2001 मध्ये त्यांच्यया संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत रत्न या सर्वोच नागरी पुरस्काराने सन्मानित केले. एम एस सुब्बलक्ष्मी यांच्यांनंतर हा पुरस्कार पटकावणाऱ्या दुसऱ्या गायिका होत्या. 1974 मध्ये, लता मंगेशकर यांनी लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण केले आणि असे करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय कलाकार होत्या.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या