By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Lata Mangeshkar Health Update: मोठी बातमी! लता मंगेशकरांनी कोरोनावर केली मात, व्हेंटिलेटर सपोर्टही काढण्यात आला
Lata Mangeshkar Health Update : लतादीदी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Lata Mangeshkar Health Update : गानसम्राज्ञी आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Singer Lata Mangeshkar) यांच्यावर प्रकतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लता मंगेशकर यांनी कोरोनावर (Corona Virus) मात केली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तसंच त्यांचे व्हेंटिलेटर सपोर्टही (Ventilator support) काढण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Heath Minister Rajesh Tope) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. लतादीदी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Also Read:
Mumbai | Veteran singer Lata Mangeshkar’s health condition has marginally improved. Her ventilator support was removed two days ago. She will continue to be under observation in ICU: Dr Pratit Samdani, Breach Candy Hospital
(file photo) pic.twitter.com/HPjbdoOHZQ
— ANI (@ANI) January 29, 2022
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, ‘लतादीदींच्या प्रकृतीत खूप चांगली सुधारणा दिसून येत आहे. त्या व्हेंटिलेटरवर होत्या. मात्र आता त्यांचे व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले आहे. न्यूमोनिया (Pneumonia) आणि कोरोनातून लतादीदी आता बऱ्या झाल्या आहेत. पण त्यांच्या ब्रेनमध्ये इन्फेक्शन (Infections in the brain) आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या लतादीदी डोळे उघडत आहेत आणि बोलत सुद्धा आहेत. त्या डॉक्टरांच्या उपचाराला चांगला प्रतिसाद सुद्धा देत आहेत. त्यांना काही प्रमाणात अशक्तपणा आहे.’
लता मंगेशकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनाची (Corona Virus) लागण झाल्यामुळे 8 जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयात (bridge candy hospital Mumbai) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये (ICU) उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी सर्वस्तरावरुन प्रार्थना केली जात आहेत. अशामध्ये आता लतादीदी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती समोर येताच त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. दरम्यान, लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात डॉक्टर प्रतित समदानी (Dr Pratit Samdani) उपचार करत आहेत. त्यांची टीम सतत लतादीदी यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.