Top Recommended Stories

Lata Mangeshkar यांची प्रकृती सुधारतेय, डॉक्टरांच्या परवानगीनंतर घरी सोडणार!

Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकर यांना 12 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाल्यामुळे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Updated: January 20, 2022 12:13 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar

Lata Mangeshkar Health Update : गानसम्राज्ञी आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Singer Lata Mangeshkar) यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाल्याने सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात (bridge candy hospital Mumbai) त्यांच्यावर आयसीयूमध्ये (ICU) उपचार सुरु आहेत. गेल्या आठ दिवसांपासून त्या रुग्णालयात आहेत. त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी सर्वस्तरावरुन प्रार्थना केली जात आहेत. अशामध्ये लतादीदींच्या प्रकृतीबाबत चांगली बातमी समोर आली आहे. लतादीदी (Latadidi) यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

Also Read:

You may like to read

लता मंगेशकर यांना 12 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाल्यामुळे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं (Corona Symptoms) जाणवत आहेत. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पण अजूनही त्या आयसीयूमध्येच आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालवली होती. मात्र लतादीदींच्या प्रवक्त्यांनी हे वृत्त नाकारले होते. आता लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर (Anusha Srinivasan Ayyar)यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या लतादीदींची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर त्यांना घरी आणले जाईल.’ लतादीदींची प्रकृती बरी होत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतित समदानी (Dr. Pratit Samdani) यांनी सांगितले की, ‘वृद्धापकाळामुळे त्यांना बरे होण्यासाठी वेळ लागत आहे. त्या अद्यापही आयसीयूमध्ये आहेत. त्या लवकरात लवकर बरे व्हाव्यात यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. सध्या त्यांना भेटण्याची कोणालाही परवानगी देण्यात आली नाही. लता मंगेशकर यांच्या घरातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळला होता. त्यानंतर लतादीदींनाही संसर्ग झाला, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, लतादीदींना यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. लतादीदींना व्हायरल इन्फेक्शन झाले होते, अशी माहिती त्यांची धाकटी बहीण उषा मंगेशकर (Usha Mangeshkar) यांनी दिली होती.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 20, 2022 12:12 PM IST

Updated Date: January 20, 2022 12:13 PM IST