Lata Mangeshkar Health update: लता मंगेशकर यांची प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टर म्हणाले...
लतादीदींना न्युमोनिया झाला असून त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे देखील आढळून आली आहे. आता लतादीदींबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लतादीदी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉक्टरांनी 'वेट अँड वॉच' ची भूमिका घेतली आहे.

Lata Mangeshkar Health update: देशाची गानसम्राज्ञी आणि भारतरत्न (bharatratna) लता मंगेशकर (Singer Lata Mangeshkar) यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील (bridge candy hospital Mumbai) आयसीयूमध्ये (ICU) उपचार सुरू आहेत. लतादीदींना (Latadidi) न्युमोनिया झाला असून त्यांच्यात कोरोनाची सौम्य (Corona Systems) लक्षणे देखील आढळून आली आहे. आता लतादीदींबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लतादीदी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉक्टरांनी ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतली आहे.
Also Read:
लतादीदी अजूनही आयसीयूमध्ये आहेत. आमच्या डॉक्टराचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. मात्र, त्यांचे वय लक्षात घेता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास जास्त कालावधी लागत असल्याची माहिती डॉ. प्रतीत समदानी (Dr.Pratit Samdani) यांनी दिली आहे. लतादीदींना लवकर बरे वाटावे यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे.
लतादीदींना गेल्या 9 जानेवारीपासून उपचार सुरू आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना खबरदारी म्हणून ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याआधी नोव्हेंबर 2019 मध्ये लतादीदींना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यावेळी मात्र लतादीदींना न्युमोनिया झाला आहे. त्यात त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे लतादीदींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
काय म्हणाले डॉक्टर?
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले, की ‘लतादीदींना वृद्धापकाळामुळे त्यांना बरे होण्यासाठी वेळ लागत आहे. त्या अद्यापही आयसीयूमध्ये आहेत. त्या लवकरात लवकर बरे व्हाव्यात यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. सध्या त्यांना भेटण्याची कोणालाही परवानगी देण्यात आली नाही. लता मंगेशकर यांच्या घरातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळला होता. त्यानंतर लतादीदींनाही संसर्ग झाला, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, लतादीदींना यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. लतादीदींना व्हायरल इन्फेक्शन झाले होते, अशी माहिती त्यांची धाकटी बहीण उषा मंगेशकर (Usha Mangeshkar) यांनी दिली होती.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या