Lata Mangeshkar Death: लतादीदी एका व्यक्तीच्या प्रेमात पडल्या होत्या, पण या कारणामुळे त्यांचे लग्न झाले नाही!
Lata Mangeshkar Death: लतादीदींचे एका व्यक्तीवर प्रेम होते. पण ती व्यक्ती सामान्य नव्हती. लतादीदी ज्यांच्या प्रमात अकंठ बुडाल्या होत्या ते एक महाराज होते.

Lata Mangeshkar Death: ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लतादीदींच्या निधनामुळे (Lata Mangeshkar Death) संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला. आज संगीत क्षेत्रातील एका मोठ्या युगाचा अंत झाला आहे. लतादीदींच्या आयुष्याशी (Latadidi Life) संबंधित अनेक गोष्टी सर्वांना माहिती आहे. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. लतादीदी यांच्या चाहत्यांना नेहमी एकच प्रश्न पडतो की त्यांनी लग्न का केले नाही?. लतादीदी यांच्या आयुष्याशी संबंधित ही गोष्ट जाणून घेण्यासाठी बरेच जण उत्सुक होते. लतादीदी एका व्यक्तीच्या प्रेमात अकंठ बुडाल्या (Latadidi Lovestory) होत्या ही गोष्ट कोणालाच माहिती नाही.
Also Read:
- Lata Mangeshkar Birth Anniversary: भावाच्या मित्रावर होते लतादीदींचे प्रेम, या कारणामुळे राहिल्या आयुष्यभर अविवाहित
- Pm Modi on Lata Mangeshkar: आज अयोध्येत होणार लता चौकाचे उद्घाटन, पंतप्रधानांनी ट्वीट करत व्यक्त केला आनंद!
- Asha Bhosle Birthday: आशा भोसले यांच्या आवाजासह हातातही आहे जादू, 'रेस्टॉरंट चेन'च्या आहेत मालकीण
तुम्हाला सर्वांना हे माहिती पडल्यावर आश्चर्य वाटेल की, लतादीदींचे एका व्यक्तीवर प्रेम होते. पण ती व्यक्ती सामान्य नव्हती. लतादीदी ज्यांच्या प्रमात अकंठ बुडाल्या होत्या ते एक महाराज होते. लता मंगेशकर यांना आपल्या भावाचा म्हणजे हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar)यांचा मित्र आवडत होता. जर त्या महाराजासोबत लतादीदींच लग्न झाले असते तर आज लता मंगेशकर एका राज्याची राणी असत्या. मात्र लता दीदींच्या आयुष्यात काही तरी वेगळं घडणार होते. जेव्हा पण लतादीदींना त्यांच्या लग्नाबद्दल विचारण्या आले होते तेव्हा त्यांनी कायम एकच उत्तर दिलं की, घरच्या जबाबदारीमुळे त्या लग्न करू शकल्या नव्हत्या.
लता मंगेशकर डुंगरपूर राजघराण्यातील महाराज राज सिंह (Maharaj Raj Singh) यांच्या प्रेमात पडल्या होत्या. लतादीदी आणि महाराज राज यांची ओळख तेव्हा झाली जेव्हा ते वकिलीचा अभ्यास करण्याकरता मुंबईत आल्या होत्या. तेव्हा लता दीदी देखील त्यांना भेटायला हृदयनाथ मंगेशकरांसोबत त्यांच्या घरी जात होत्या. मात्र लतादीदी आणि राज यांनी लग्न केलं नाही. कारण राज यांच्या कुटुंबियांनी अगोदरच सांगितलं होतं की, ते कोणत्याही सामान्य मुलीशी लग्न करु शकत नाही. महाराज राज यांनी देखील आपल्या कुटुंबियांना दिलेला शब्द पाळला होता. पण हे दोघं एकमेकांच्या प्रेमात एवढे आकंठ बुडाले होते की त्यांनी आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लतादीदींची प्रेम कहाणी शेवटपर्यंत अधुरी राहिली.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या