Top Recommended Stories

Lata Mangeshkar dead: आठवणीतील लता मंगेशकर... जाणून घ्या लतादीदींच्या जीवनातील कधी न ऐकलेले रंजक किस्से

लतादीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. लतादीदी या पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या थोरल्या कन्या होत. त्यांचे वडील थिएटर कलाकार आणि गायक होते.

Updated: February 6, 2022 11:24 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Lata Mangeshkar passes away

Lata Mangeshkar Passes Away: भारत रत्न, गानसम्राज्ञी आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Singer Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले आहे. त्या 92 व्या वर्षांच्या होत्या. मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये (Mumbai’s Breach Candy Hospital) उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत (Lata Mangeshkar dies) मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनाची (Lata Mangeshkar Passes Away) बातमी समजताच संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का (Lata Mangeshkar dead) बसला आहे.

Also Read:

लतादीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. लतादीदी या पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या थोरल्या कन्या होत. त्यांचे वडील थिएटर कलाकार आणि गायक होते. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर या सिनेविश्वातील अशाच एक गायिका होत्या, की त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य केवळ गायन आणि कुटुंबासाठी वाहून घेतले.

लतादीदींनी त्यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी आपल्या करियरला सुरूवात केली. त्यांनी अनेक चित्रपटांना सुपरहिट आणि संस्मरणीय गाणी दिली, जी कायम स्मरणात राहतील. चला तर मग जाणून घेऊ या लतादीदी अशा परिस्थितीत यामागचे कारण काय होते ते जाणून घेऊया लतादीदींच्या जीवनातील कधी न ऐकलेले रंजक किस्से…

You may like to read

Koo App

भारतीयांच्या भावविश्वात अढळस्थान मिळविलेल्या ’गानकोकिळा’ अशी ओळख असणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर (दीदी) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. लतादिदी मागील काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होत्या. त्या बऱ्या होऊन परत येतील असा विश्वास होता. पण नियतीला हे मान्य नव्हते. लतादिदींनी प्रदिर्घ काळ पार्श्वगायन केले.‌ अनेक अजरामर गीते त्यांनी गायली आहेत.

Supriya Sule (@supriya_sule) 6 Feb 2022


> 28 सप्टेंबर 1929 रोजी जन्मलेल्या लतादीदींचे खरे नाव लता नाही, बालपणी त्यांना ‘हेमा’ नावाने हाक मारत. नंतर त्यांच्या वडिलांचे ‘भावबंधन’ या नाटकातील ‘लतिका’ या प्रसिद्ध पात्रावरून त्यांचे नाव ‘लता’ असे ठेवण्यात आले.

> लता मंगेशकर या पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या थोरल्या कन्या होत्या. लता दीदींना चार लहान भावंडे आहेत. ज्यांची नावे मीना, आशा भोसले, उषा आणि हृदयनाथ मंगेशकर आहेत.

> लता मंगेशकर यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे थिएटर आर्टिस्ट आणि शास्त्रीय गायक होते. त्यांच्या आईचे नाव शेवंती (सुधामती) होते. सुधामती या पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. दीनानाथ मंगेशकर यांची पहिली पत्नी लता मंगेशकर यांच्या मावशी होत्या. त्यांचे लग्नानंतर काही महिन्यातच निधन झाले आणि नंतर 1927 मध्ये सुधामती यांच्याशी लग्न केले.


>वडील दीनानाथ हे शास्त्रीय गायक आणि नाट्य कलाकार होते. त्यामुळे लहान वयातच लतादीदींचे संगीताशी नाते जुळले.

> लताजींनी वयाच्या पाचव्या वर्षीच गायिला सुरुवात केली. त्यांनी तत्कालीन प्रस्थापित आणि प्रसिद्ध गायक अमान अली खान साहिब आणि अमानत खान यांच्याकडे संगीताचा अभ्यास केला. परंतु चित्रपटसृष्टीत लतादीदींना नाकारण्यात आले. कारण, त्यावेळी बॉलिवूडमध्ये नूरजहाँ आणि शमशाद बेगमचे राज्य होते.

> लता मंगेशकर केवळ पाच वर्षांच्या असताना त्यांनी वडिलांच्या नाटकात कामही केले होते.

> लता मंगेशकर यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य मुंबईत व्यतीत केले असले, तरी त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची 16 वर्षे इंदूर शहरातच घालवली.

> सन 1938 मध्ये, जेव्हा त्या 9 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांनी पहिल्यांदाच सोलापूरच्या नूतन थिएटरमध्ये सार्वजनिकपणे गायन केले. त्यावेळी त्यांनी दोन मराठी गाणी आणि राग खंबावती गायली.

> 1942 मध्ये वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांनी कुटुंब चालवण्यासाठी 1942 ते 1948 दरम्यान 8 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

> लता मंगेशकर यांनी 1942 साली ‘किती हसल’ या मराठी चित्रपटासाठी पहिले गाणे गायले होते, पण हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही.

> 1949 साली प्रदर्शित झालेल्या महल चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ या गाण्याने लता दीदींना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

>लता मंगेशकर यांनी 1955 मध्ये ‘राम राम पावणे’ या मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदा संगीत दिले. तथापि, त्यांनी 1960 च्या दशकात आनंद घन या टोपणनावाने अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिले असल्याचे सांगितले जाते.

> लता मंगेशकर यांनी 27 जानेवारी 1963 रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘ए मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तीपर गीत गायले. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यात अश्रू आले होते. हे गाणे 1962 च्या भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना समर्पित होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वत: त्यांना सांगितले की, लतादीदींच्या गाण्याने त्यांच्या डोळ्यात पाणी आले.

>1974 मध्ये, लता मंगेशकर यांनी लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण केले आणि असे करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय कलाकार होत्या.

> असे सांगितले जाते, की लता दीदींचा असा विश्वास होता की त्यांचा आवाज सायरा बानोला सर्वात योग्य आहे.

> गुलाम हैदर यांना लतादीदींचे देव पिता मानले जात होते, कारण खुद्द लता मंगेशकर यांच्या म्हणण्यानुसार, गुलाम हैदर यांनी त्यांच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला होता.

> लता मंगेशकर यांच्या निषेधानंतर 1059 मध्ये प्रथमच सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाची श्रेणी फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये जोडण्यात आली.

> राज कपूर यांचा 1978 चा सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘सत्यम शिवम सुंदरम’ने लता मंगेशकर यांचे जीवन प्रेरित होते. त्यांनी या चित्रपटात काम करावे, अशी त्यांची इच्छा होती.

> लता मंगेशकर यांना 1999 मध्ये राज्यसभेवरही नामांकन देण्यात आले होते. त्यांचा कार्यकाळ 2006 मध्ये संपला होता. मात्र, संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित न राहिल्याने त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण संसदेत गैरहजर राहिल्याचे सांगितले.

> राज्यसभेचे खासदार असताना त्यांनी कधीही पगार घेतला नाही किंवा दिल्लीत सरकारी निवासही घेतला नाही.

> लता मंगेशकर या आजपर्यंतच्या भारतातील महान महिला गायिका होत्या. अर्धशतकाहून अधिक काळ चाललेल्या आपल्या गायन कारकिर्दीत त्यांनी 35 हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली.

>1974 मध्ये लता मंगेशकर यांचे नाव सर्वात जास्त गाणी गाण्यासाठी गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले. तोपर्यंत तिने जवळपास 25 हजार गाणी गायली होती.

> 1999 मध्ये, लता इओ डी परफम त्यांच्या नावाने लॉन्च करण्यात आली.

> लता मंगेशकर यांनी 1000 हून अधिक हिंदी आणि 36 प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना आपला आवाज दिला.

> 2001 मध्ये त्यांच्यया संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत रत्न या सर्वोच नागरी पुरस्काराने सन्मानित केले एम एस सुब्बलक्ष्मी यांच्यांनंतर हा पुरस्कार पटकावणार्या दुसऱ्या गायिका आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 6, 2022 10:50 AM IST

Updated Date: February 6, 2022 11:24 AM IST