Top Recommended Stories

Mahabharatमधील 'भीम'चे निधन, Praveen Kumar Sobti यांनी 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

Praveen Kumar Sobti Passes Away: पंजाबचे रहिवासी असलेल्या प्रवीण कुमार यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Published: February 8, 2022 10:20 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Praveen Kumar Sobti Passes Away
Praveen Kumar Sobti Passes Away

Praveen Kumar Sobti Passes Away: छोट्या पडद्यावरील ‘महाभारत’ (Mahabharat Serial) या प्रसिद्ध मालिकेत ‘भीम’ची (bheem) भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti Passes Away) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रवीण कुमार (Praveen Kumar Dies) हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. आजारी असल्यामुळे ते घराबाहेर पडत नव्हते. त्यांची पत्नीच घरी त्यांची काळजी घेत होती. पंजाबचे (Punjab) रहिवासी असलेल्या प्रवीण कुमार यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Also Read:

भीमाच्या पात्रातून मिळाली लोकप्रियता –

रामानंद सागर (Ramanand Sagar) निर्मित ‘महाभारत’ मालिकेतील पाच पांडवांपैकी एक असलेल्या भीमची भूमिका प्रवीण कुमार यांनी साकारली होती. भीमाच्या भूमिकेतील प्रवीण कुमार सोबती सर्वांना खूप आवडले. या मालिकेमुळे ते घराघरामध्ये पोहचले. प्रवीण कुमार सोबती यांनी आपल्या अभिनयाने भीमाच्या व्यक्तिरेखेत प्राण आणले होते.

You may like to read

क्रीडाविश्वात होते प्रसिद्ध –

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रवीण कुमार हे हॅमर आणि डिस्क थ्रोचे खेळाडू (Hammer and disc throw players) होते. आशियाई स्पर्धेत त्याने 2 सुवर्ण (Gold Medal), 1 रौप्य (Silver Medal) आणि 1 कांस्य पदक (Bronze Medal) जिंकले होते. आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत (Asian and Commonwealth Games) पदकं जिंकून त्यांनी देशाचे नाव उंचावले होते. त्यांना ‘अर्जुन पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. क्रीडा जगतात नाव कमावल्यानंतर त्यांना बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची (BSF) नोकरीही मिळाली, पण काही वर्षांनी प्रवीणकुमार सोबती यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

पंजाब सरकारवर होते नाराज –

प्रवीण कुमार यांनी पेन्शनबाबत पंजाब सरकारवर (Punjab Government) नाराजी व्यक्त केली होती. पंजाबमध्ये आलेल्या सर्व सरकारांच्या तक्रारी असल्याचे त्यांनी म्हटले होते. सर्व आशियाई खेळ किंवा पदक विजेत्यांना पेन्शन देण्यात आली पण त्यांना पेन्शन देण्यात आली नव्हती. राष्ट्रकुलचे प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव खेळाडू होते. तरी सुद्धा पेन्शनच्या बाबतीत त्यांना सावत्र आईची वागणूक देण्यात आली होती. या तक्रारीमुळे प्रवीणकुमार सोबती खूप चर्चेत होते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 8, 2022 10:20 AM IST