मुंबई: ‘झी मराठी’ (Zee Marathi) या लोकप्रिय वाहिनीवर सुरू झालेली ‘तुझी माझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) ही नवी मालिका अल्पवधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) मुख्य भूमिकेत आहे. दोघांच्या केमस्ट्रीनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.Also Read - Aadhaar Update: आता घरबसल्या करू शकता 'आधार'मध्ये हे महत्वाचे बदल; UIDAI ने ट्वीट करून दिली महत्त्वाची माहिती

प्रार्थनानं तब्बल 10 वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुरागमन केलं आहे. याआधी ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushantsingh Rajput) याच्यासोबत ती ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) या मालिकेत दिसली होती. प्रार्थनानं आतापर्यंत मराठी मालिका आणि चित्रपटांमधून काम केलं आहे. Also Read - IPL 2021 RCB vs KKR: विराट कोहलीचं स्वप्न भंगलं! रोमांचक लढतीत कोलकाताचा दणदणीत विजय


निखळ सौंदर्य आणि आपल्या मनमोहक हास्यानं लाखो रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या प्रार्थना सध्या चर्चेत आहेत. तिचे साडीतील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रार्थनानं तिचे ट्रॅडिशनल लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
Also Read - Neha Kakkar च्या घरी लवकरच पाळणा हलणार! गायिकेनं पहिल्यांदाच सोडलं मौन

त्याचं झालं असं की, प्रार्थना नुकतीच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या प्रमोशनसाठी ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ (chala hawa yeu dya) या कार्यक्रमात आली होती. तिच्यासोबत श्रेयस तळपदेसह मालिकेतील स्टारकास्ट आले होते. त्यावेळचा प्रार्थनाचे साडीतील फोटो आता चांगलेच व्हायरल होत आहेत.

प्रार्थना बेहेरे हिनं आतापर्यत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांत काम केलं आहे. तिचा ‘कॉफी आणि बरंच काही’ हा चित्रपट देखील लोकप्रिय ठरला होता. अभिनेता स्वप्निल जोशीसोबत ‘मितवा’ या चित्रपटात देखील प्रार्थना दिसली होती.