Top Recommended Stories

Malaika-Arbaaz Video: मलायका अरोरा आणि अरबाज खान पुन्हा एकत्र, व्हायरल व्हिडिओवर नेटिझन्स म्हणाले...

Malaika-Arbaaz Video: मलायका आणि अरबाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते त्यांचा मुलगा अरहान खानला सोडण्यासाठी मुंबई एअरपोर्टवर आल्याचे दिसत आहे.

Updated: February 7, 2022 3:07 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Malaika-Arbaaz

Malaika-Arbaaz Video: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अरबाज खान ( Actor Arbaaz Khan) त्याची एक्स वाईफ मलायका अरोरामुळे (Actress Malaika Arora) नेहमी चर्चेत असतो. ते एकत्र होते तोपर्यंत त्यांच्या जोडीची अनेक जण उदाहरणे देत होते. पण 19 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अरोरा (Malaika-Arbaaz Divorce) ही अभिनेता अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) रिलेशनशिपमध्ये आहे. या रिलेशनशीपमुळे देखील मलायका सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. आता मलायका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते म्हणजे ती आणि अरबाज खान पुन्हा एकत्र दिसले आहेत. दोघेही मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) एकत्र दिसले आणि यावेळी त्यांचा मुलगा देखील उपस्थित होता.

Also Read:

मलायका अरबाज पुन्हा एकत्र आले –

मलायका अरोरा आणि अरबाज खान एकमेकांपासून वेगळे झाले असले तरी त्यांचा मुलगा अरहानसाठी ते अजूनही एक आहेत. दोघेही आपल्या आयुष्यात कितीही व्यस्त असले तरी जेव्हा मुलाचा प्रश्न येतो तेव्हा ते एकत्र उभे असलेले दिसतात. मलायका आणि अरबाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते त्यांचा मुलगा अरहान खानला सोडण्यासाठी मुंबई एअरपोर्टवर आल्याचे दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये मलायका, अरबाज आणि त्यांचा मुलगा अरहान एका फ्रेममध्ये दिसत आहेत.

You may like to read

व्हायरल होतोय व्हिडिओ –

व्हायरल भयानीच्या (Viral Bhaiyani) पेजवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये मलायका अरोरा आणि अरबाज खान त्यांच्या मुलासोबत मुंबई एअरपोर्टवर दिसत आहेत. यावेळी तिघांनीही तोंडावर मास्क लावल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये अरबाज आणि मलायका एकमेकांशी बोलतानाही दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अरहानही त्याच्या मित्रांना भेटताना दिसत आहे. अल्पावधीतच या पोस्टवर लाखो लाईक्स आले आहेत ज्यावर नेटिझन्स प्रतिक्रिया देत आहेत.

मलायका अर्जुनला करतेय डेट –

व्हिडिओवर कमेंट करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, ‘तुम्ही का भांडत आहात’ तर दुसऱ्याने लिहिले की, ‘अर्जुनपेक्षा मलायका अरबाजसोबत चांगली दिसते’. तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, ‘घटस्फोटानंतरही मुलं त्यांच्या आई-वडिलांसाठी अनमोल भेटवस्तू असतात, जे दोघांमधील नातं टिकवून ठेवतात’. अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर आल्या आहेत. अरबाज खानपासून वेगळे झाल्यानंतर मलायका अरोरा सध्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 7, 2022 3:06 PM IST

Updated Date: February 7, 2022 3:07 PM IST