Top Recommended Stories

Malaika Aroraचा ब्लॅक मोनोकिनी ड्रेसमध्ये बोल्ड अंदाज, फोटो पाहून चाहते घायाळ!

Malaika Arora Black Transparent Dress : मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर मलायकाचे ब्लॅक कलरच्या मोनोकिनी ड्रेसमध्ये फोटो व्हायरल होत आहे.

Published: February 25, 2022 2:01 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Malaika Arora Black Transparent Dress
Malaika Arora Black Transparent Dress

Malaika Arora Black Transparent Dress : बॉलिवूड (Bollywood) चित्रपट निर्माता आणि अभिनेता फरहान अख्तरने (Farhan Akhtar) नुकताच गर्लफ्रेंड शिबानीसोबत लग्न केले. फरहानचा मित्र रितेश सिधवानीने (Ritesh Sidhwani) फरहान आणि शिबानीसाठी (Shibani Dandekar) गुरुवारी शानदार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला (Farhan Akhtar-Shibani Dandekar Party) अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी (Bollywood Celebrities) उपस्थिती लावली. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरापासून (Malaika Arora) ते अर्जुन कपूर (Arjun Kapoor), करीना कपूर (Kareena Kapoor), करिश्मा कपूर (Karishma Kapoor), दीपिका पादुकोण (Deepika Padukon) हे या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. पण सर्वांच्या नजरा मलायका अरोरावर होत्या. कारण मलायका अरोराने या पार्टीमध्ये नेहमीप्रमाणे जबरदस्त ड्रेसिंग केली होती. मलायकाला या लूकमध्ये पाहिल्यानंतर सर्वांना धक्का बसला. मलायकाच्या या लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Also Read:

You may like to read

मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर मलायकाचे ब्लॅक कलरच्या मोनोकिनी ड्रेसमध्ये फोटो (Malaika Arora Photoshoot) व्हायरल होत आहे. मलायकाने फरहान आणि शिबानीच्या लग्नानंतरच्या पार्टीत हा ड्रेस घातला होता. या ड्रेसमुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. मलायका अरोरा ही इंडस्ट्रीतील सर्वात स्टायलिश दीवा मानली जाते आणि गुरुवारी झालेल्या या पार्टीत तिने हे सत्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. मलायका अरोराचा रिव्हिलिंग ड्रेस सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेत्रीची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. मलायका अरोरा तिच्या गर्ल गँगसोबत पार्टीत पोहोचली होती. या पार्टीमध्ये सगळ्यांच्या नजरा मलायका अरोरावरच होत्या. तिने ब्लॅक कलरचा पारदर्शक गाऊन घातला होता. ज्यामध्ये बाजूला एक कट होता. मलायका या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

मलायका अरोराने फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नाच्या पार्टीच्या फोटोंमध्ये सर्व लाइमलाइट लुटले आहे. मलायकाचा या ड्रेसमधील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मलायकाच्या गर्ल गँगमधील चारही सुंदरी एकत्र पोज देताना दिसत आहेत. दुसरीकडे, या पार्टीत करिश्मा कपूरपासून मलायका अरोरापर्यंत सर्वांचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. या चौघी देखील ब्लॅक कलरच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या त्यांनी या पार्टीत खूपच मजा केली.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 25, 2022 2:01 PM IST