नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी दुबईला पसार झाल्याचं वृत्त समोर येत आहे. ‘इफेड्रीन’च्या तस्करीमध्ये ममता आणि तिचा पती विकी गोस्वामीचं नाव पुढे आलं होतं. ममतासह 14 जणांवर अमली पदार्थ तस्करीचे आरोप आहेत.

एप्रिल आणि मे महिन्यात ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर या प्रकरणा ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीचं नाव समोर आलं. दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णीला फरार घोषित करण्यात आलं होतं.  बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी केनियातून दुबईला पळाल्याची माहिती समोर येत आहे.

स्पेशल नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) अॅक्ट कोर्टाने ममता आणि विकीला दोषी ठरवून त्यांच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश दिले होते. यापूर्वी न्यायालयाने अटक वॉरंट बजावलं होतं. मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे पोलिसांनी ममताच्या यारी रोडवरील घरावर चिटकवली होती.

केनियातून विकीसोबत त्याचे साथीदार इब्राहिम, बख्ताश आक्शा आणि पाकिस्तानी अमली पदार्थ वितरक गुलाम हुसैन यांनाही अटक करण्यात आली होती. अजूनही अनेक आरोपी फरार आहेत.