मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचा (Marathi Film Industry) प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकरचे (Actor Santosh Juvekar) सोशल मीडिया अकाऊंट (Social Media Account) हॅक झाले आहे. स्वत: संतोष जुवेकरनेच फेसबुकवर पोस्ट करत आपले इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंट हॅक (Santosh Juvekar Social media Account hacked) झाल्याची माहिती दिली आहे. ही पोस्ट करत त्याने आपल्या चाहत्यांना आवाहन देखील केले आहे. याप्रकरणी संतोषने सायबर सेलकडे (Cyber cell) तक्रार दाखल केली आहे.Also Read - सिद्धार्थ- मितालीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Also Read - Arya Ambekar affair: "ते माझे मार्गदर्शक आहेत", प्रसिद्ध गायकाला डेट करत असल्याच्या चर्चांवर आर्या आंबेकरची प्रतिक्रिया

मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रीय असतो. संतोष सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. अचानक त्याचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले. याबाबत त्याने फेसबुकवर पोस्ट (Facebook Post) करत ही माहिती दिली. त्याने असे म्हटले आहे की, ‘हॅलो मित्रांनो मी परवा पोस्ट केली होती की माझं फेसबुक ऑफिशियल पेज हॅक झालंय आणि बहुतेक इन्स्टा सुद्धा. ते स्लोव्ह झालं असं मला वाटत होतं पण ते झालं नाहीये. माझ्या पेजवरुन काहीही वाह्यात पोस्ट आणि स्टोरी पोस्ट होतायत. प्लीज त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मी सायबर सेलकडे तक्रार केली आहे. धव्यवाद.’ Also Read - Maharashtra Shahir Movie: शाहीर साबळे यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर, नातू केदार शिंदेंनी केली चित्रपटाची घोषणा

संतोष जुवेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, काही दिवसांपूर्वीच संतोषचा ‘हिडन’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) प्रदर्शित झाला. या चित्रपटात संतोष जुवेकरने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ या मराठी चित्रपटांमध्ये (Marati Movie) दमदार भूमिका साकारल्या. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली.