Senior Singer Kirti Shiledar Pass Away: रंगभूमी गाजविणाऱ्या कीर्ती शिलेदार कालवश; पुण्यात घेतला अखेरचा श्वास!
Senior Singer Kirti Shiledar Pass Away: 60 वर्षे रंगभूमीवर आपली कला सादर करणाऱ्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या 10 व्या वर्षी या क्षेत्रात पदार्पण केले होते.

Senior Singer Kirti Shiledar Pass Away: प्रसिद्ध रंगकर्मी आणि ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांचे आज निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar Death) या 70 वर्षाच्या होत्या. कीर्ती शिलेदार यांच्या अचानक जाण्यामुळे मनोरंजनसृष्टीवर (Entertainment World) शोककळा पसरली आहे.
Also Read:
कीर्ती शिलेदार यांनी 60 वर्षे रंगभूमीला दिली आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली. उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं. 60 वर्षे रंगभूमीवर आपली कला सादर करणाऱ्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या 10 व्या वर्षी या क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांनी आपल्या अभिनयाने (Acting) सर्वानांच आपलंस केले होते. अभिनयच नव्हे तर त्यांनी आपल्या आवाजाची जादूसुद्धा सर्वांवर पसरवली होती. त्या अभिनेत्रीसोबतच (Actress) एक उत्कृष्ट गायिका (Singer) सुद्धा होत्या.
2018 साली भूषविले नाट्यसंमेलन अध्यक्षपद
ज्येष्ठ रंगक्रमी आणि गायिका कीर्ती शिलेदार यांना घरातूनच कलेचे बाळकडू मिळाले होते. वयाच्या 10 व्या वर्षीच त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते. आपल्या अभिनयाने आणि गायनाने त्यांनी आपला ठसा उमलविला होता. यासह त्यांनी 2018 साली नाट्यसंमेलनाचे (Natya Sammelan) अध्यक्षपद भूषविले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या