मुंबई : प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकर (marathi actress and youtuber urmila nimbalakar) आई झाली आहे. उर्मिलाने गोंडस मुलाला जन्म दिला (urmila nimbalakar blessed baby boy) आहे. 3 ऑगस्ट रोजी उर्मिलाला पुत्ररत्न झाले त्याबद्दल तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत आई झाल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आई झाल्याबद्दल उर्मिला खूपच आनंदी आहे. सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय असणाऱ्या उर्मिलाने गरोदरपणातील अनेक फोटो पोस्ट करत तिचा अनुभव शेअर (Share Photo) केला होता.Also Read - IPL 2021: या स्टार क्रिकेटपटूची पत्नी अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, फोटो वाढवतील हृदयाची धडधड!

Also Read - सिद्धार्थ- मितालीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

उर्मिला निंबाळकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट (Instagram Post) करत आई झाल्याची गोड बातमी शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘वडिलांवर, भावावर, सासऱ्यांवर आणि सगळ्यात जास्त चुकलं म्हणजे नवरा सुकीर्त गुमास्तेवर अति प्रेम असलं की रंगभुमीपेक्षा जास्त नाट्य निर्मिती खऱ्या आयुष्यात होऊन हिरोची एन्ट्री होते. माझ्या आयुष्यात 3 ऑगस्टला सकाळी हिरोची एन्ट्री झालीय!’ Also Read - Riteish Dekhmukh Video: रितेश देशमुखने मजेशीर व्हिडिओ केला शेअर, म्हणाला- ‘माझी पत्नी मला देव समजते पण जेव्हा…’

उर्मिला निंबाळकरच्या (Urmila nimbalkar) या पोस्टला तिच्या चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. तिची ही पोस्ट लाईक करत त्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. उर्मिलाने तिच्या गरोदरपणाचे सुख घेत त्याचा अनुभव आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. तिने अगदी बेबी बंम्पसोबतच्या फोटोशूटपासून (Baby Bump Photoshoot) ते डोहाळ जेवणापर्यंतचे सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. उर्मिलाचे डोहाळ जेवण तिचा 9वा महिना पूर्ण झाल्यानंतर करण्यात आले होते. पुण्यातील ढेपेवाड्यामध्ये राजेशाही थाटात तिच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम झाला होता. याचे फोटो आणि व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.