Rohit Raut- Juilee Joglekar Wedding: गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर अडकले विवाहबंधनात, लग्नाचे फोटो होतायत व्हायरल!
Rohit Raut- Juilee Joglekar Wedding: रोहित आणि जुईली गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. व्हेलेंटाइन डेच्या दिवशी दोघांनी एकमेकांसोबतचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती.

Rohit Raut- Juilee Joglekar Wedding : सारेगमप लिटिल चॅम्पमधून (Saregampa Little Champ) घराघरामध्ये पोहचलेला मराठमोळा गायक रोहित राऊत (Marathi Singer Rohit Raut) नुकताच विवाहबंधात अडकला. रोहितने त्याची गर्लफ्रेंड गायिका जुईली जोगळेकरशी लग्न (Rohit Raut- Juilee Jogleka Wedding) केले. आज पुण्यातील ढेपेवाड्यामध्ये (Dhepe Wada) दोघांचा विवाहसोहळा पार पडला. रोहित आणि जुईली यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर (Photo Viral On Social Media) व्हायरल होत आहे. दोघांच्याही चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
Also Read:
रोहित आणि जुईली गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. बऱ्याचदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. अखेर दोघे आज विवाहबंधनात अडकले. दोघांच्याही घरी लग्नसराईची जोरदार तयारी सुरु होती. दोघांच्याही ग्रहमख, साखरपुडा, संगीत, महेंदी आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
रोहित आणि जुईली (Rohit Raut- Juilee Joglekar) या दोघांनी देखील आपल्या लग्नासोहळ्यातील खास क्षण आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. दोघांच्याही प्रत्येक फोटोला चाहत्यांनी लाईक्स करत भरभरुन कमेट्स केल्या आहेत. रोहित आणि जुईलीच्या खास मैत्रीण मिताली मयेकरने या लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
रोहित राऊतसारखीच त्याची पत्नी जुईली देखील गायिका आहे. ती ‘सूर नवा ध्यास नवा’ (Sur Nava Dyas Nava) या शोमध्ये सहभागी झाली होती. या शोच्या माध्यमातून तिने अनेकांच्या मनावर जादू केली होती. रोहित आणि जुईली गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. व्हेलेंटाइन डेच्या दिवशी दोघांनी एकमेकांसोबतचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या