By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Mi Punha Yein: 'नगरविकास शिवाय मुख्यमंत्री म्हणजे…' सयाजी शिंदेच्या त्या व्हिडिओने वेधलं सर्वांचं लक्ष!
Mi Punha Yein: अभिनेता सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde) यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर ‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजमधील त्यांचा एक जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले असून विचार करायला लावले आहे.

Mi Punha Yein: राज्यात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर (Maharashtra Political Crisis) सध्या एका वेबसीरिजची जोरदार चर्चा होतेय ती म्हणजे ‘मी पुन्हा येईन’ (Mi Punha Yeil Webseries). या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तिची जोरदार चर्चा होतेय. या वेबसीरिजने प्रेक्षकांना चांगलाच विचार करायला लावला आहे. या वेबसीरिजमधील एकापेक्षा एक जबरदस्त डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत आणि ते सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल देखील होत आहेत. नुकताच अभिनेता सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde) यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर ‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजमधील त्यांचा एक जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले असून विचार करायला लावले आहे.
सयाजी शिंदेनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सयाजी शिंदे आणि उपेंद्र लिमये (Upendra Limaye) हे दोघे संवाद साधताना दिसत आहेत. दोघांनी देखील एखाद्या राजकीय नेत्यांसारखीच कपडे परिधान केली आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, “चला गृहमंत्रीपद तुम्हाला…” असे उपेंद्र लिमये हे सयाजी शिंदे यांना या सांगताना दिसत आहेत. यावर सयाजी शिंदे म्हणतात, “नाही मला नगरविकास मंत्रीपद पाहिजे.” यावर परत उपेंद्र म्हणतात, “बस का…नगरविकास शिवाय मुख्यमंत्री म्हणजे बंदुकीशिवाय इन्स्पेक्टर वाटेल ना…” दोघांचे हे जबरदस्त डायलॉग सर्वांचे लक्ष वेधत आहेत.
Trending Now
सयाजी शिंदे यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून त्यावर कमेंट्स करत दोघांच्याही चाहत्यांनी त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. राजकारणावर भाष्य करणारी आणि बरेच रहस्य उलगडवणारी (New Web Series) ही नवी कोरी वेब सीरिज ‘मी पुन्हा येईन’ (Mi Punha Yein) 29 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्लॅनेट मराठी ओटीटीवर ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे.
रविंद जगताप लिखित या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठीने केली आहे. या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रूचिता जाधव, भारत गणेशपुरे असे जबरदस्त कलाकार पाहायला मिळणार आहेत. या वेबसीरिजमधील संवादांनीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या बेवसीरिजच्या बाबत प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता असून कधी रिलीज होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या