मुंबई : मिशन इम्पॉसिबल स्टार टॉम क्रुझने (Tom Cruise)पुन्हा एकदा थरारक स्टंट केला आहे. ‘मिशन: इम्पॉसिबल’ (Mission: Impossible) सीरीजच्या सातव्या आणि आठव्या सीझनचं सध्या शूटिंग सुरू आहे. या शूटिंगदरम्यान टॉम क्रुझने हा स्टंट केला आहे. या स्टंटचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका टेकडीवर तुटलेल्या ट्रॅकवरून ट्रेन दरीत कोसळताना (Train crash) दिसत आहे. स्टंट शूट होत असताना बॅकग्राउंडला एक हेलिकॉप्टर देखील उडताना दिसून येत आहे.Also Read - OMG..!'बाहुबली'ची हॉलिवूडमध्ये धांसू एंट्री! टॉम क्रूजच्या 'Mission Impossible 7'मध्ये झळकणार प्रभास!

View this post on Instagram

A post shared by VillagerJim (@villagerjim)

कोरोना महामारीमुळे ‘मिशन: इम्पॉसिबल 7’चं (Mission: Impossible 7) शूटिंग आणि रिलीज थांबवण्यात आलं होतं. मात्र आता पुन्हा शुटिंगला सुरुवात झाली आहे. ‘मिशन: इम्पॉसिबल’च्या सातव्या आणि आठव्या सीझनचं बॅक टू बॅक शूटिंग सुरू करण्यात आले आहे. दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅक्वेरी (Christopher McQuarrie) 2022 मध्ये ‘मिशन: इम्पॉसिबल 7’ प्रदर्शीत करण्याची तयारी करत आहेत. तर ‘मिशन: इम्पॉसिबल 8’ (Mission: Impossible 8) 2023 मध्ये प्रदर्शीत करण्याचा निर्मात्यांचा विचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. या सीरिजमध्ये टॉम क्रुझ व्यतिरिक्त हेन्री, सायमन पेग, रेबेका फर्ग्युसन, व्हेनेसा किर्बी आणि फ्रेडरिकही काम करत आहेत. (Mission: Impossible 7: Mission Impossible star Tom Cruise’s thrilling stunt; Shocking video of train crash going viral)

अमेरिकन अभिनेता टॉम क्रुझ (Tom Cruise) नेहमीच आपल्या अभिनयासोबच थराक स्टंट करण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. त्याने केलेला हा ट्रेन क्रॅशचा (Train crash Video) थरारक अॅक्शन सीन ‘मिशन: इम्पॉसिबल 7’च्या शूटिंगदरम्यान डर्बीशायरमध्ये (Derbyshire) शूट करण्यात आला आहे. स्टोनी मिडलटनमध्ये (Stoney Middleton) हा सीन शूट करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू होती. स्टंट शूट करताना तेथे उपस्थित असलेल्या स्थानिक फोटोग्राफर आणि काही लोकांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. (Mission: Impossible 7: Mission Impossible star Tom Cruise’s thrilling stunt; Shocking video of train crash going viral)