Top Recommended Stories

Mumbai Local: मुंबईच्या ट्रॅफिकचा नवाजुद्दीन सिद्दीकीला कंटाळा, लोकलने प्रवास करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Mumbai Local: महानगरांमध्ये (Metro City) ट्रॅफिकची (Traffic)  समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील (Mumbai) ट्रॅफिकच्या समस्येबाबत बोलायलाच नको. मुंबईच्या ट्रॅफिकमुळे सार्वधिक गोंधळ उडतो तो बॉलिवूड सेलिब्रिटींचा (Bollywood Celebrity). पब्लिक फिगर असल्यामुळे त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा (Public Transport) लाभ घेता येत नाही.

Updated: March 30, 2022 4:06 PM IST

By Vikas Chavhan | Edited by Vikas Chavhan

Mumbai Local: मुंबईच्या ट्रॅफिकचा नवाजुद्दीन सिद्दीकीला कंटाळा, लोकलने प्रवास करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Mumbai Local: महानगरांमध्ये (Metro City) ट्रॅफिकची (Traffic)  समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील (Mumbai) ट्रॅफिकच्या समस्येबाबत बोलायलाच नको. मुंबईच्या ट्रॅफिकमुळे सार्वधिक गोंधळ उडतो तो बॉलिवूड सेलिब्रिटींचा (Bollywood Celebrity). पब्लिक फिगर असल्यामुळे त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा (Public Transport) लाभ घेता येत नाही. कारण, दिसताच त्यांना फॅन्स घेरून घेतात. असे असताना देखील अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा बिनधास्तपणे मुंबई लोकलचा (Mumbai Local Train) आनंद लुटत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीचा लोकल प्रवासाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Nawazuddin Siddiqui Viral Video)  होत आहे. या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

व्हिडिओत नवाजुद्दीन सिद्दीकी असल्याचा दावा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतील व्यक्तीची ओळख पटविणे कठीण आहे. व्हिडिओतील व्यक्तीने मास्क लावले आहे. यासह डोळ्यावर चष्मा देखील लावला आहे. इंस्टाग्रामवर निर्मल भुरा याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओत नवाजुद्दीन सिद्दीकी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

You may like to read

लोकलमधून प्रवास करत असल्याची दिली कबुली

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा नुकताच एका वृत्तवहिणीच्या कार्यक्रमात गेला होता त्याठिकाणी आपण ‘मुंबईच्या ट्रॅफिकपासून बचाव करत लोकल ट्रेनने प्रवास करतो’ अशी कबुली दिली होती. यावर तुम्ही फॅन्सपासून ओळख  कशी लपवितात? असे विचारले असता कोरोनाच्या या काळात मास्कने चेहरा लपवणे सोपे झाले आहे. त्यामुळे लोकलने सहज प्रवास करता येतो असे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने सांगितले होते.

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास नवाजुद्दीन सिद्दीकी ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात नायिका म्हणून अवनीत कौर दिसणार आहे. जी नवाजुद्दीन सिद्दीकी पेक्षा वयाने खूपच लहान आहे. यासह रोम रोम में, नूरानी चेहरा, हिरोपंती 2 आणि फोबिया 2 मध्ये दिसणार आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.