Top Recommended Stories

Nora Fatehi Birthday: 5 हजार रुपये घेऊन भारतात आली, लॉटरीचे तिकीट विकणारी नोरा फतेही अशी झाली बॉलिवूडची 'दिलबर गर्ल'!

Nora Fatehi Birthday: 'साकी साकी', 'दिलबर', 'कमरिया' यासारख्या गाण्यांवर डान्स करुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नोरा फतेहीचा आज वाढदिवस आहे.

Updated: February 6, 2022 2:36 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Nora Fatehi
Nora Fatehi

Nora Fatehi Birthday : बॉलिवूडची (Bollywood) ‘दिलबर गर्ल’ (Dilbar Girl) अर्थात अभिनेत्री नोरा फतेहीला (Actress Nora Fatehi) आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. बॉलीवूड जगतात आपल्या डान्सिंग मूव्ह (Dance Moves) आणि स्टाइलसाठी (Nora Fatehi Style) प्रसिद्ध असलेल्या नोरा फतेहीच्या डान्सने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. ‘साकी साकी’, ‘दिलबर’, ‘कमरिया’ यासारख्या गाण्यांवर डान्स करुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नोरा फतेहीचा आज वाढदिवस (Nora Fatehi Birthday) आहे. 6 फेब्रुवारी 1992 रोजी कॅनडातील मॉन्ट्रियल येथे जन्मलेल्या नोराचे आयुष्य सोपे नव्हते. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त (Hindi Movie), नोरा तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. मॉडेल (Model) आणि अभिनेत्री (Actress) सोबतच ती खूप चांगली बेली डान्सर देखील आहे. नोराच्या सौंदर्य आणि हॉटनेसने सर्वांनाच भूरळ पाडली आहे. सोशल मीडियावर सर्वांना याचा प्रत्यय येतोच. नोराच्या वाढदिवसानिमित्ताने आज आपण तिच्या आयुष्याशीसंबंधित काही रंजक आणि मनोरंजक गोष्टी जाणून घेणार आहोत…

Also Read:

– नोरा फतेही एक मोरोक्कन-कॅनडियन नृत्यांगना, मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

You may like to read

– नोरा फतेही ज्यावेळी पहिल्यांदा भारतामध्ये आली तेव्हा तिच्या खिशात फक्त पाच हजार रुपये होते.

– नोरा फतेहीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने स्वतःचे पोट भरण्यासाठी कॉफी शॉपमध्ये काम केले होते. तिने टेलिकॉलर म्हणूनही काम केले आहे. या नोकरीत ती लॉटरीची तिकिटे विकायची. हे काम तिने फक्त सहा महिने केले. त्यानंतर तिने ही नोकरी सोडली.

– नोरा फतेहीने ‘रोर – टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. खऱ्या अर्थाने तिने आपल्या करिअरची सुरुवात या चित्रपटापासून केली.

– नोरा फतेहीने तेलुगू चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्यात ‘बाहुबली’ आणि ‘किक 2’ यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

– नोरा ही ट्रेंड डान्सर नाही हे अनेकांना माहीत नसेल. तिच्या ज्या बेली डान्सने संपूर्ण जगाला वेड लावले आहे ते ती यूट्यूबवर पाहून शिकली आहे.

– रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 9’ मध्ये स्पर्धक म्हणून सामील झाल्यानंतर नोराला खरी ओळख मिळाली.

– नोरा एक उत्तम डान्सर तर आहेच पण मार्शल आर्ट्समध्येही तिचा ट्रेंड आहे.

– नोरा फतेहीलाही तिच्या ड्रेसमुळे अनेकवेळा उप्स मोमेंटचा शिकार व्हावे लागले आहे.

– नोरा फतेही ‘क्रेझी कुक्कड फॅमिली’, ‘मिस्टर एक्स’, ‘रॉकी हँडसम’, ‘सत्यमेव जयते’, ‘स्त्री’, ‘भारत’, ‘बाटला हाउस’, ‘मरजावान’ आणि ‘स्ट्रीट डान्सर 3D’या चित्रपटातील गाण्यामध्ये देखील दिसली आहे.

– नोरा फतेही अनेक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्येही दिसली आहे.

– नोरा सचिन तेंडुलकरची खूप मोठी फॅन आहे आणि युवराज सिंगची चांगली मैत्रीण आहे. तिला क्रिकेटची प्रचंड आवड आहे.

– नोरा फतेहीने बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाचा पती अंगद बेदीला डेट केले आहे . बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपनंतर या परिस्थितीतून सावरण्यासाठी तिला वेळ लागल्याचे नोराने सांगितले होते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 6, 2022 2:36 PM IST

Updated Date: February 6, 2022 2:36 PM IST