मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Bollywood Actress Nora Fatehi) आणि जॅकलिन फर्नांडिसला (jacqueline fernandez) सक्तवसुली संचालनालयानं (Enforcement Directorate (ED) समन्स बजावला आहे. तिहार कारागृहातून 200 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी (Money Laundering Case) ED नं नोरा फतेही हिला चौकशीसाठी तर जॅकलिन फर्नांडिसला साक्षीदार म्हणून बोलावलं आहे. काही दिवसांपूर्वी याप्रकरणी जॅकलिनचा जबाब नोंदवला होता.Also Read - मी ज्ञानदेवच...! पण बायको प्रेमानं 'दाऊद' म्हणायची; समीर वानखेडेंच्या वडिलांचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर

नोरा फतेही (Nora Fatehi) हिनं अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपला जम बसवला आहे. इंडस्ट्रीतील टॉप एक्ट्रेसमध्ये नोराचं नाव घेतलं जातं. नोराचे आइटम सॉन्ग्सचे लोक अक्षरश: दिवाने आहेत. या शिवाय सुंदर फिगरमुळे नोरा सोशल मीडियावर चर्चेत आहे. तुम्हाला माहित आहे का, नोरा फतेहीला भारताची किम कार्दशियन (Kim Kardashian) असं संबोधलं जातं. अमेरिकन टीव्ही स्टार किम कार्दशियनची कर्वी फिगरचे लाखो लोक दिवाने आहेत. तसंच काहीच नोराचं देखील आहे. नोराचे फोटोज (Nora Fatehi Photos) इंटरनेटवर सर्वाधिक पाहिले जातात.
Also Read - Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल आज पुन्हा महागलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

नोरा फतेही (Nora Fatehi) ही एक कनेडियन मॉडेल-अभिनेत्री आहे. या शिवाय ती एक उत्तम बॅली डान्सर देखील आहे. नोरा आतापर्यंत अनेक आइटम सांग्सवर थिरकली आहे. ‘साकी साकी’, ‘दिलबर’, ‘कमरिया’ आदींचा समावेश आहे. Also Read - Photo of a Sweet Couple: नवाब मलिकांचा आणखी एक बॉम्ब, समीर वानखेडेंच्या 'निकाह'चा फोटो केला शेअर

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोरानं काही दिवसांपूर्वी बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसनं तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली होती. नोराच्या या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: आग लावली होती. असं पहिल्यांच झालं नाही, तर या आधी अनेकदा नोरानं तिची कातिलाना अदा दाखवून चाहत्यांना घायाळ केलं आहे.

नोरा फतेही (Nora Fatehi) हिचा फॅशन सेंस देखील कमाल आहे. ती पब्लिक प्लेसमध्ये येताच तिचा लुक व्हायरल होतो. नोराचे फोटोज पाहाण्यासाठी चाहते आतूर असतात. नोरा प्रत्येक ड्रेसमध्ये मादक दिसते. बॉडीकॉन ड्रेसबाबत सांगायचं झाल्यास ती त्यात अधिक खुलून दिसते. त्यामुळेच कदाचित नोरा असे ड्रेसेस परिधान करून जगासमोर आपला जलवा दिखवत असावी.

नोरा फतेहीनं तिच्या करियरची सुरुवात हिंदी चित्रपट ‘रोर- टाइगर्स ऑफ द सुंदरबन्स’मधून केली होती. नंतर ती तेलुगु चित्रपट ‘टेम्पर’, ‘किक 2’ आणि ‘बाहुबली’ मध्येही दिसली होती. नोरानं ‘भुज’ मध्ये देखील मुख्य भूमिका साकारली आहे. पहिल्यांदाच नोरा एक्शन करताना दिसली आहे.