नवी दिल्ली – पान सिंह तोमर आणि पीपली लाइव यासारख्या सिनेमांत भूमिका केलेले अभिनेता सीताराम पांचाल यांचं गुरुवारी निधन झालं.

अभिनेता सीताराम पांचाल हे गेल्या अनेक दिवसांपासून मूत्रपिंड आणि फुफ्फुसाच्या कर्गरोगाने त्रस्त होते. गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सीताराम पांचाल यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

सीताराम पांचाल यांनी १९९४ साली आलेल्या ‘बँडिट क्वी’ या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी ‘पान सिंग तोमर’, ‘पीपली लाईव्ह’, ‘जॉली एलएलबी २’, ‘स्लमडॉग मिलिनेयर’, ‘बँडेट क्वीन’ यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका केल्या. या भूमिकांमुळे सीताराम यांनी बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

कर्करोगाच्या उपचारासाठी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमधून त्यांच्या उपचारासाठी नागरिकांना मदतीसाठी आवाहन केलं होतं. सीताराम पांचाल यांच्या उपचारासाठी हरियाणा सरकारनेही पाच लाख रुपयांची मदत केली होती.