By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Pankaj Kapoor Birthday : पंकज कपूर यांच्या चित्रपटाला मिळाले होते 8 ऑस्कर पुरस्कार, मुलगा देखील आहे यशस्वी बॉलिवूड स्टार!
Pankaj Kapoor Birthday : भारतीय टेलिव्हिजन जगात 90 च्या दशकात फेमस कॉमेडी शो ऑफिस-ऑफिसमधून ( Office-Office ) मुसद्दीलालचे ( Musaddilal ) पात्र साकारणारे अभिनेते पंकज कुमार ( Pankaj Kapoor ) यांना आजही लोका 'मुसद्दीलाल' नावाने ओळखतात. पंकज कपूर हे एक यशस्वी अभिनेतेसह एक चांगले वडील देखील आहे.

Pankaj Kapoor Birthday : भारतीय टेलिव्हिजन जगात 90 च्या दशकात फेमस कॉमेडी शो ऑफिस-ऑफिसमधून ( Office-Office ) मुसद्दीलालचे ( Musaddilal ) पात्र साकारणारे अभिनेते पंकज कुमार ( Pankaj Kapoor ) यांना आजही सर्वजण ‘मुसद्दीलाल’ नावाने ओळखतात. पंकज कपूर हे एक यशस्वी अभिनेतासोबत एक चांगले वडील देखील आहे. शहिद कपूरला ( Shahid Kapoor ) बॉलिवूड स्टार बनवण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. पंकज कपूर आज आपला 68 वा वाढदिवस साजरा करत आहे. लुधियाना येथे 29 मे 1954 रोजी त्याचा जन्म झाला असून वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याविषयी रंजक किस्से…
चित्रपटाने मिळवले 8 ऑस्कर
पंकज कपूर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात 1982 मधे आलेला चित्रपट ‘आरोहण’ पासून केली होती. त्यानंतर रिचर्ड एटनबरोच्या ‘गांधी’ या चित्रपटात महात्मा गांधी यांचे दुसरे सचिव प्यारेलालची भूमिका त्यांनी साकारली. या चित्रपट त्याची भूमिका छोटी होती मात्र त्याचा अभिनय प्रभावी होता. फारच कमी लोकांना माहित असेल की, या चित्रपटाला 8 ऑस्कर पुरस्कार मिळाले आहे.
टीव्हीवर पण केली कमाल
पंकज कपूर यांनी फक्त मोठ्या पडद्यावरच नव्हे तर टीव्हीवर देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी टीव्हीमध्ये देखील यशस्वी करिअर बनवलं. त्यानी 80 च्या दशकातील मालिका ‘करमचंद’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. तेव्हाच ते लोकप्रिय ठरले होते. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून शिक्षण पूर्ण करत बराच वेळ थिएटर केले. पंकज कपूर यांना ‘मकबूल’ आणि ‘डॉक्टर की मौत’ या चित्रपटात पसंती मिळाली होती. त्यानंतर ते ‘धर्मा’, चमेली, ‘एक रुका हुआ फैसला’, ‘मै प्रेम की दिवानी हूं ‘ या सारख्या चित्रपटात दिसले.
पंकज यांनी केले दोन लग्न
पंकज कपूर यांच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे त्याची ओळख अभिनेत्री नीलिमा अजीम त्यांच्याशी झाली. त्यानंतर दोघांनी लग्न केले. काही वर्षांनी शहीद कपूरचा जन्म झाला. नीलिमा गेल्यानंतर पंकज यांच्या आयुष्यात सुप्रिया पाठक आल्या. आज सुप्रिया आणि पंकज आपल्या वैवाहिक जीवनात खुश आहेत. दोघांना एक मुलगी असून तिचे नाव सना कपूर आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या