Top Recommended Stories

चित्रपटापेक्षा कमी नाही Paresh Rawal यांची लव्हस्टोरी , बॉसच्या मुलीसोबतच असे केले लग्न!

Paresh Rawal Birthday Special : बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये आपले नाव नोंदवणाऱ्या परेश रावल यांची फॅन फॉलोइंग भारतातच नाही तर जगभरात आहे. सोशल मीडियावर आपले म्हणणे मोकळेपणाने मांडणारे परेश रावल आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलत नसले तरी त्यांचे वैयक्तिक आयुष्य चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.

Published: May 30, 2022 11:36 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Paresh Rawal With Wife
Paresh Rawal With Wife

Paresh Rawal Birthday Special : बॉलिवूड (Bollywood) अभिनेते परेश रावल (Actor Paresh Rawal) हे चित्रपटसृष्टीतील अशा मोजक्या कलाकारांपैकी एक आहेत ज्यांना कोणतेही पात्र साकारण्यात कोणतीही अडचण येत नाही. खलनायक असो किंवा सुंदर मुलीचा बाप असो किंवा ‘फिर हेरा फेरी’चा बाबू भैय्या असो, प्रत्येक पात्रात परेश रावलने लोकांची मने जिंकली आहेत. अभिनेते परेश रावल आज आपला 67 वा वाढदिवस (Paresh Rawal Birthday) साजरा करत आहेत. परेश यांचा जन्म 30 मे 1955 रोजी मुंबईतील गुजराती कुटुंबात (Gujarati Family) झाला. परेश रावल यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांच्या आयुष्याविषयी आणि लव्हस्टोरीविषयी (Paresh Rawal Lovestory) जाणून घेणार आहोत…

Also Read:

लहानपणापासूनच अभिनयाची आवड –

बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये आपले नाव नोंदवणाऱ्या परेश रावल यांची फॅन फॉलोइंग भारतातच नाही तर जगभरात आहे. सोशल मीडियावर आपले म्हणणे मोकळेपणाने मांडणारे परेश रावल आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलत नसले तरी त्यांचे वैयक्तिक आयुष्य चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. लहानपणापासूनच त्यांना रंगभूमीची आवड होती आणि त्यांची अभिनय कारकीर्द सुरू व्हायला वेळ लागला नाही. परेश रावल त्याच्याच बॉसच्या मुलीला आपले हृदय देऊन बसले होते आणि त्यांनी तिच्याशीच लग्न केले हे फार कमी लोकांना माहिती आहे.

You may like to read

स्वरूप संपतशी केले लग्न –

अभिनेते परेश रावल यांनी मिस इंडिया स्वरूप संपतशी लग्न केले आहे. जी त्यांच्या बॉसची मुलगी होती. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, जेव्हा त्यांनी स्वरूपला पहिल्यांदा पाहिले तेव्हा ते आपले हृदय तिला देऊन बसले. मग काय, त्यांनी ठरवलं की लग्न करायचं असेल तर स्वरूपसोबत करायचं. पण त्यांना अशी भीती देखील होती की स्वरूप ही त्यांच्या बॉसची मुलगी आणि मिस इंडिया होती. त्यांच्या लग्नाबाबत परेश म्हणाले होते की, ‘त्या दिवसांत माझा मित्र महेंद्र जोशी माझ्यासोबत होता, मी त्याला स्वरूपबद्दल सांगितले तेव्हा तो म्हणाला की, तुला हे माहिती नाही का की तू ज्या कंपनीत काम करतोस त्या कपंनीच्या बॉसची ती मुलगी आहे.’

परेश यांनी स्वरूपला असे केले प्रपोज –

परेश यांनी स्वरूपशी लग्न करायचे ठरवले होते. म्हणून तो त्यांच्या मित्राला म्हणाला, ‘कोणाचीही मुलगी असे, बहीण असे किंवा आई असो… मी स्वरुपशीच लग्न करीन.’ तो दिवसही लवकर आला जेव्हा परेशने स्वरूपला प्रपोज केले. परेश स्वरूपला म्हणाला, ‘मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, पण मला सांगू नकोस की आपण एकमेकांना ओळखू या… कारण आपण मरेपर्यंत कोणीही कोणाला ओळखू शकत नाही.’ यानंतर वर्षभर स्वरूप आणि परेश यांच्यात संवाद झाला नाही.

पत्नीने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले –

स्वरूप यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, परेशच्या प्रपोजनंतर त्यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही, परंतु काही काळानंतर त्यांनी अभिनेत्याचे नाटक पाहिले आणि ती त्यांची चाहती झाली. यानंतर स्वरूप आणि परेश यांच्यात जवळीक वाढली. दरम्यान, स्वरूपने 1979 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि जिंकली. त्याच वर्षी, तिने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. नंतर स्वरूप आणि परेश यांनी 1987 मध्ये लग्न केले. त्यांना आदित्य आणि अनिरुद्ध रावल ही दोन मुले आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.