नवी दिल्ली: अभिनेत्री परिणीती चोप्रा अनेकदा प्रोफेशनल कारणांमुळे चर्चेत असते. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी परिणीती सध्या आपल्या कुटुंबियांसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. परिणीतीने तिच्या मालदीव व्हेकेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. अलीकडेच तिने लाल बिकिनीमध्ये एक फोटो शेअर करून चाहत्यांच्या ह्रदयाची स्पंदने वाढवली होती. त्यानंतर आता तिने एक जलपरी अंदाजातला व्हिडिओ शेअर केला आहे. (Parineeti Chopra’s Monokani video gose viral; Netizens love Parineeti Chopra’s Monokani style)Also Read - Bride Dance Video: लग्नमंडपात नवरीची जबरदस्त एन्ट्री, डान्स पाहून नवरदेवाला बसला धक्का!

Also Read - Monkey Funny Video: आरशात स्वत:चा चेहरा पाहून माकडाला बसला धक्का, पुढे जे काही झाले ते तुम्हीच बघा!

परिणीतीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या तिने पिवळी मोनोकिनी परिधान केलेली दिसत असून ती जलपरी बनून स्विमिंगचा आनंद घेताना दिसत आहे. परिणीतीच्या हा बोल्ड (Parineeti Chopra Bold) अवताराला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. पूलमध्ये रिलॅक्स करणाऱ्या या परिणीतीच्या सौंदर्याचंही खूप कौतुक केले जात आहे. ‘शांती’ असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. परिणीतीने शेअर केलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. Also Read - Sooryavanshi Movie Release Date: अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' दिवाळीत करणार धमाका, 5 नोव्हेंबरला होणार रिलीज!

परिणीतीच्या या व्हिडिओवर तिच्या फॉलोवर्सकडून मोठ्या प्रमाणात रिअॅक्शन्स आणि कमेंट करण्यात येत आहेत. प्रत्येकजण तिच्या या हॉट स्टाईलमुळे घायाळ झाला आहे. परिणितीने ‘संदीप और पिंकी फरार’, ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ आणि ‘सायना’ सारख्या न्यू रिलीज चित्रपटांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘शुद्ध देसी रोमान्स’ (2013) आणि ‘हसी तो फसी’ (2014) या चित्रपटांमधील परिणीतीच्या कामाचे कौतुक झाले आहे. परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लेडीज वर्सेस रिकी’ बहल या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. (Parineeti Chopra’s Monokani video gose viral; Netizens love Parineeti Chopra’s Monokani style)