Top Recommended Stories

Pawankhind Box Office Collection: 'पावनखिंड' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, बाजी प्रभूंच्या शौर्याची थरारक कथा

Pawankhind Box Office Collection: मराठी चित्रपटसृष्टीबद्दल असं म्हटलं जातं की इथे खूप अप्रतिम चित्रपट बनतात आणि प्रत्येक वेळी तो खूप वेगळा असतो. बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मराठी चित्रपटाचा आवाज घुमू लागला आहे.

Published: February 23, 2022 12:50 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Pawankhind Box Office Collection: 'पावनखिंड' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, बाजी प्रभूंच्या शौर्याची थरारक कथा
Pawankhind Box Office Collection

Pawankhind Box Office Collection: मराठी चित्रपटसृष्टीबद्दल असं म्हटलं जातं की इथे खूप अप्रतिम चित्रपट बनतात आणि प्रत्येक वेळी तो खूप वेगळा असतो. बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मराठी चित्रपटाचा आवाज घुमू लागला आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या पावनखिंड (Pawankhind) या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई करण्यास सुरुवात केली आहे.

Also Read:

गेल्या काही दिवसांपासून प्रादेशिक चित्रपटांनी (regional cinema) आपली ताकद दाखवली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ देखील गेल्या काही वर्षांत वाढली आहे. उत्तरेकडील भागांमध्ये देखील त्यांची आवड प्रचंड वाढली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘पुष्पा’ चित्रपट. पुष्पाने फक्त दक्षिणेत तर हिंदी पट्ट्यातही चांगली कामाई केली. त्यानंतर आता नुकताच प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा पावनखिंडही (Pawankhind) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ (Pawankhind Box Office Collection) घालत असून लोक त्याला भरभरून प्रेम देत आहेत..

You may like to read

पावनखिंड हा ऐतिहासिक चित्रपट दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केला असून तो पावनखिंडची लढाई लढणारे प्रसिद्ध मराठा योद्धे बाजी प्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात बाजी प्रभूंचे शौर्य अतिशय अप्रतिम पद्धतीने दाखवण्यात आले आहे. चित्रपटातील मुख्य स्टारकास्टमध्ये चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे. लोकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले आहे.

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे झाले तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मराठा सैन्याने पावनखिंड काबीज केली तेव्हा सिद्धी जोहरने शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी किल्ल्याभोवती पहारा उभारला आणि त्यादरम्यान मराठा सैन्य आणि शिवाजी महाराज तिथेच अडकले आणि या कथेतून ते दाखवण्यात आले आहे. या लढाईत सुमारे 600 जणांनी बलिदान दिले होते. शिवाजी महाराजांना किल्ल्यातून बाहेर काढण्यात ते यशस्वी झाले. परंतु या लढाईत प्रभू देखपांडे यांना प्राण गमवावे लागले. पावनखिंड चित्रपट त्यांच्या याच शौर्याची कथा सांगणारा आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 23, 2022 12:50 PM IST