मुंबई: बॉलिवूडमधून दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती आणि दिग्दर्शक राज कौशल (Actress Mandira Bedi Husband Raj Kaushal Death) यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने (Heart Attack) निधन झालं. राज कौशल यांनी मुंबईत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे 4 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी मंदिरा आणि दोन मुले असा परिवार आहे. राज यांची अचानक झालेली एक्झिट मनोरंजन विश्वाला चटका लावणारी आहे.Also Read - पहिली महिला स्पोर्ट्स अँकर होती Mandira Bedi, दूरदर्शनच्या 'शांती' मालिकेतून केली होती करिअरला सुरुवात!

राज कौशल एक निर्माता आणि स्टंट डायरेक्टर होते. त्यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कारकिर्दीत त्यांनी तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन राज कौशल यांनी केले आहे. तर ‘माय ब्रदर निखिल’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘प्यार में कभी-कभी’ या चित्रपटांची निर्मितीही त्यांचीच केली होती. Also Read - पतीच्या आठवणीत भावुक झाली Mandira Bedi, फोटो शेअर करून म्हणाली..' RIP My Raji..'

View this post on Instagram

A post shared by Raj Kaushal (@rajkaushal)

Also Read - आता उरल्या फक्त आठवणी! पाहा, Mandira Bedi आणि Raj Kaushik यांच्या लग्नाचा अल्बम

ही ठरली शेवटची पोस्ट-

राज (Raj Kaushal) यांनी सोमवारी इंस्टग्रामवर ही पोस्ट केली होती. पण तिच त्यांची शेवटची पोस्ट ठरली. रविवारी राज यांनी मित्रांसोबत पार्टी केली होती. पार्टीत झहीर खान, नेहा धूपिया आणि अंगद बेदी सहभागी झाले होते. राज यांनी मंदिरा (Mandira Bedi) आणि मित्रांसोबत काढलेला फोटो सोमवारी सोशल मीडियावर शेअर केला होता. रविवार खूप आनंदात गेला, असंही देखील राज यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर राज कौशल यांच्या मुलांनी गेल्या रविवारीच ‘फादर्स डे’निमित्त (Fathers Day) वडिलांसोबत सेल्फी शेअर केले होते.

View this post on Instagram

A post shared by Raj Kaushal (@rajkaushal)


मंदिरा बेदी आणि राज कौशल यांनी 1999 मध्ये लव्ह मॅरेज होतं. 2011 मध्ये त्यांना मुलगा वीर याचा जन्म झाला. तर गेल्याच वर्षी राज आणि मंदिरा यांनी 4 वर्षांच्या मुलगी दत्तक घेतली होत . तारा असं तिचं नाव आहे.