मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात (Pornography Case) अटकेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Bollywood Actress Shilpa Shetty) नवरा आणि बिझनेसमन राज कुंद्राच्या (Raj Kundra) अडचणीच चांगलीच वाढ झाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात राज कुंद्राचे चार कर्मचारी (Raj Kundra Employee) सरकारी साक्षीदार होणार आहेत. या कर्मचाऱ्यांनी मुंबई क्राईम ब्रँचला (Mumbai Crime Branch) अश्लील चित्रपट रॅकेटसंदर्भात सर्व माहिती दिली आहे. राज कुंद्राविरोधात क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलला (Property Branch of Crime Branch) महत्वाची माहिती मिळाली आहे. ऐवढंच नाही तर राज कुंद्राने दीड वर्षात पॉर्न चित्रपटातून (Porn Movie) जवळपास 20 कोटी रुपयांची कमाई केली असल्याचे तपासातून उघड झाले असल्याची माहिती समोर आली आहे.Also Read - Raqesh And Shamita Dinner Date: राकेश बापटने अखेर वचन केले पूर्ण, शमिता शेट्टीला डिनर डेटवर गेला घेऊन!

महत्वाचे म्हणजे राज कुंद्राच्या अंधेरी (Andheri) येथील ऑफिसची प्रॉपर्टी सेलच्या टीमकडून झाडाझडती घेण्यात आली. याठिकाणी त्यांना एक गुप्त कपाट सापडले. या कपाटात काही बॉक्स फाईल्स होत्या. ज्यामध्ये क्रिप्टो करन्सीसंदर्भातील माहिती होती. यामुळे राज कुंद्रा क्रिप्टो करेन्सी (Cryptocurrency) म्हणजेच डिजिटल पैशांमध्ये व्यवहार करत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. पॉर्न फिल्म तयार करुन कमावलेले पैसे तो केंरीन कंपनीला पाठवले जायचे. पण केंरीन कंपनीतून ते पैसे त्याला पुन्हा एका विशिष्ट माध्यमातून मिळत होते. हे पैसे राज कुंद्राला कोणत्या माध्यमातून मिळत होते याचा तपास प्रॉपर्टी सेलकडून घेतला जात आहे. Also Read - Nora Fatehis Bold Look: नोरा फतेहीचा व्हाईट कट आऊट ड्रेसमध्ये जलवा, फोटो पाहून चाहते घायाळ!

वियान कंपनीचा वापर पॉर्न फिल्म रॅकेट चालवण्यासाठी केला जात होता. 2017 मध्ये शिल्पा शेट्टीने या कंपनीतून डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 2020मध्ये तिच्या सासूने देखील राजीनामा दिला होता. या संपूर्ण प्रकरणाचा क्राईम ब्रँचकडून कसून तपास सुरु आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai police Crime Branch) कुंद्राला चौकशीसाठी बोलावले. दिवसभर चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने राज कुंद्रा आणि त्याचे आयटीप्रमुख रयान थ्रोपसह त्याच्या पोलिस कोठडीमध्ये 27 जुलैपर्यंत वाढवली आहे. Also Read - पती राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर येताच शिल्पा शेट्टीनं दिली Good News