Top Recommended Stories

Prakash Jha Birthday: Aashram बनवणाऱ्या प्रकाश झा यांनी फुटपाथवर काढल्या अनेक रात्री, लग्नाच्या 17 वर्षानंतर घटस्फोट

Prakash Jha Birthday:: बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रकाश झा यांना कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. ते त्यांच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. बहुतांश चित्रपटांतून सामाजिक विषयांवर भाष्य करणारे प्रकाश झा यांचा आज वाढदिवस आहे.

Published: February 27, 2022 10:22 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Prakash Jha Birthday: Aashram बनवणाऱ्या प्रकाश झा यांनी फुटपाथवर काढल्या अनेक रात्री, लग्नाच्या 17 वर्षानंतर घटस्फोट
Prakash Jha Birthday

Prakash Jha Birthday:: बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रकाश झा (Prakash Jha) यांना कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. ते त्यांच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. बहुतांश चित्रपटांतून सामाजिक विषयांवर भाष्य करणारे प्रकाश झा यांचा आज वाढदिवस (Prakash Jha Birthday) आहे. बिहारमधील चंपारण येथे 27 फेब्रुवारी 1952 रोजी जन्मलेले प्रकाश झा यांचे चित्रपट नेहमीच निर्भिड राहिले आहेत. त्यांनी सैनिक स्कूल तिलैया येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि पुढील शिक्षण बोकारो येथून पूर्ण केले.

Also Read:

रक्षण, गंगाजल, सत्याग्रह यांसारखे चित्रपट (Prakash Jha Movies) बनवणारे प्रकाश झा त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत. त्याचे काही चित्रपटही वादात सापडले आहेत. खूप संघर्ष केल्यानंतर त्यांनी चित्रपट विश्वात एक खास स्थान निर्माण केले आहे.आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित आणखी काही न ऐकलेले तथ्य आणि मनोरंजक गोष्टी. (Lesser Known Facts of Prakash Jha)

You may like to read

Prakash Jha Birthday and Unknown Facts

  • प्रकाश झा (Prakash Jha) यांना लहानपणापासूनच चित्रकार व्हायचे होते. पण मुंबईत आल्यानंतर त्यांनी धर्म या चित्रपटाचे शूटिंग पाहिल्यावर त्यांनी चित्रपट निर्माता व्हायचं ठरवलं.
  • प्रकाश झा यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की ‘एक काळ असा होता जेव्हा त्यांच्याकडे भाडे देण्यासाठीही पैसे नव्हते.
  • सुरुवातीच्या काळात जुहूच्या फूटपाथवर रात्री काढल्याचेही त्यांनी सांगितले.
  • प्रकाश झा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात इनसाइड द ब्लू या डॉक्यूमेन्ट्रीपासून केली. यानंतर त्यांनी अनेक डॉक्यूमेन्ट्री आणि लघुपट बनवले.

  • प्रकाश झा यांनी 1984 साली हिप हिप हुर्रे या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शनात पदार्पण केले.
  • प्रकाश झा यांच्या पहिल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
  • 2010 मध्ये त्यांनी ‘राजनीती’ चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट खूप हिट चित्रपट ठरला.
  • प्रकाश झा यांनी 1985 मध्ये अभिनेत्री दीप्ती नवलसोबत लग्न केले. हे लग्न 17 वर्षे टिकले. 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
  • सध्या प्रकाश झा त्यांच्या आश्रम या वेब सीरिजमुळे देखील चर्चेत आले आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 27, 2022 10:22 AM IST