By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Shehnaaz Gil करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री, Salman Khan च्या या चित्रपटात दिसणार?
Shehnaaz Gill Bollywood Debut : शहनाज गिल सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत सलमान खान व्यतिरिक्त आयुष शर्माचीही एन्ट्री झाली आहे. आयुषसोबत शहनाजला कास्ट करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

Shehnaaz Gill Bollywood Debut : पंजाबची कतरिना म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल शहनाज गिल कैफ (Shehnaaz Gil) बिग बॉसपासून (Bigg Boss) खूपच चर्चेमध्ये आहे. नुकताच शहनाज गिल बाबा सिद्दीकींच्या (Baba Siddique) इफ्तार पार्टीमध्ये दिसली होती. याठिकाणी शहनाज गिल आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) -सलमान खान (Salman Khan) यांच्यामध्ये खूपच चांगली बाँडिंग सर्वांना पाहायला मिळाली. या इफ्तार पार्टीमधील शहनाज गिलचे शाहरुख खान आणि सलमान खानसोबतचे बरेच फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Photo) होत आहेत. अशामध्ये आता अशी माहिती समोर आली आहे की, शहनाज गिल लवकरच सलमान खानच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहनाज गिल सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत सलमान खान व्यतिरिक्त आयुष शर्माचीही एन्ट्री झाली आहे. आयुषसोबत शहनाजला कास्ट करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पण जर शहनाज या चित्रपटामध्ये काम करणार असेल तर हा तिचा बॉलिवूडमधील डेब्यू असेल.
बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झालेली शहनाज गिल घराघरामध्ये पोहचली. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. याचवेळी बिग बॉसमध्ये शहनाज गिल आणि सलमान खान यांच्यातील एक प्रेमळ मैत्री सर्वांनी पाहिली होती. दरम्यान, सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज गिल खूपच दु:खी झाली होती. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाजला बॉलीवूडमधूनही भावनिक आधार मिळाला होता. सलमान खान विशेषत: शहनाजची काळजी घेतो. प्रत्येक इव्हेंटमध्ये तिला कम्फर्टेबल फिल करताना तो दिसतो हे सर्वांनी पाहिले आहे.
दरम्यान, शहनाजने स्वतःच्या आणि सलमानच्या नात्याबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली होती की, ‘लोकांना वाटले असेल की मी सलमान खानसोबत एकांतात वेळ घालवला असेल, पण मी कधीही वैयक्तिकरित्या त्यांना भेटले नाही.’ दरम्यान, शहनाज गिल सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. बिग बॉसच्या घरामध्ये असलेली शहनाज आणि आताची शहनाज याच्यामध्ये खूप फरक आहे. शहनाजने स्वत:मध्ये खूपच बदल केला आहे. एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीला टक्कर देईल अशी शहनाज गिल सध्या दिसते.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या