Raj Kundra Pornography Case : पोर्नोग्राफी प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने कास्टिंग डायरेक्टरसह 4 जणांना केली अटक!
Raj Kundra Pornography Case : अटक केलेल्या या आरोपींवर मॉडेल्सकडून जबरदस्ती पॉर्न शूट करुन घेतल्याचा आरोप आहे. यामध्ये एका कास्टिंग डायरेक्टरचा राज कुंद्राच्या कंपनीशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.

Raj Kundra Pornography Case : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्याशी संबंधित पॉर्नोग्राफी प्रकरणी ( pornography case) मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने (Mumbai Police Crime Branch) मंगळवारी मोठा छापा टाकला. मुंबईतील वर्सोवा (Versova) आणि बोरिवली (Borivali) परिसरातून याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. या आरोपींवर मॉडेल्सकडून जबरदस्ती पॉर्न शूट करुन घेतल्याचा आरोप आहे. यामध्ये एका कास्टिंग डायरेक्टरचाही राज कुंद्राच्या कंपनीशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला 20 सप्टेंबर रोजी जामीन मिळाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch) राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थॉर्प यांच्याविरुद्ध 1500 पानांचे चार्टशीट (Chargeshit) न्यायालयात दाखल केले होते. यामध्ये हे दोघेही या पॉर्नोग्राफी रॅकेटचे (Pornography Racket) मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला होता.
Also Read:
Raj Kundra pornography case | Four more persons including a casting director arrested, from Versova and Borivali areas, says Mumbai Police Crime Branch
— ANI (@ANI) February 22, 2022
पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने 19 जुलै 2021 रोजी अटक केली होती. याप्रकरणी राज कुंद्रा यांची पोलिसांनी तासंतास चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर राजचा आयटी सहकारी रायन थॉर्प यालाही दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 जुलै 2021ला अटक करण्यात आली होती. राज कुंद्राच्याअटकेनंतर काही व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आले होते ज्यावरुन राज कुंद्राने पॉर्न फिल्म बनवण्याच्या व्यवसायातून चांगली कमाई केली असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा या पॉर्न फिल्ममधून दररोज 8 लाखांची कमाई करत होता.
दरम्यान, नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार राज कुंद्राने पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावावर 5 फ्लॅट हस्तांतरित केले आहेत. राज कुंद्राने मुंबईतील किनारा या बंगल्याचा संपूर्ण पहिला मजला पत्नी शिल्पा शेट्टी कुंद्राच्या नावावर हस्तांतरित केला आहे. ज्यामध्ये 5 फ्लॅट आहेत. या मालमत्तेची किंमत 38.5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा बंगला समुद्रकिनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर बांधला आहे. राज कुंद्रा यांचे खरे नाव रिपू सुदान कुंद्रा आहे. सध्या या बंगल्यात शिल्पा आणि राज कुंद्रा दोघेही आपल्या मुलांसोबत राहतात.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या