By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Ram Charan Birthday Special: टॉलीवूडचा 'गोल्डन बॉय' राम चरण आहे कोट्याधीश, एअरलाईन्स कंपनीचा आहे मालक!
Ram Charan Birthday Special : राम चरणचा 'आरआरआर' चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला भरभरुन प्रेम देत राम चरणच्या चाहत्यांनी त्याला वाढदिवसानिमित्त खास भेट दिली आहे. टॉलिवूडमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर राम चरणने अभिनेत्री प्रियंका चोप्रासोबत 'जंजीर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न केला.

Ram Charan Birthday Special : टॉलिवूडचा (Tollywood) ‘गोल्डन बॉय’ (Tollywood Golden Boy) म्हणून ओळख असलेल्या सुपरस्टार राम चरणचा (Superstar Ram Charan) आज वाढदिवस आहे. राम चरण आज आपला 37 वा वाढदिवस (Ram Charan Birthday) साजरा करत आहे. राम चरण हा साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा आहे. राम चरणचा ‘आरआरआर’ चित्रपट (RRR Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला भरभरुन प्रेम देत राम चरणच्या चाहत्यांनी त्याला वाढदिवसानिमित्त खास भेट (Ram Charan Birthday Special) दिली आहे. राम चरणचा जन्म 27 मार्च 1985 रोजी चेन्नईमध्ये झाला. 2007 मध्ये पुरी जगन्नाथच्या ‘चिरुथा’ चित्रपटातून राम चरणने आपल्या करिअरला सुरुवात केली. रामचरणला या पहिल्याच चित्रपटासाठी 2007मध्ये फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.
टॉलिवूडमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर राम चरणने अभिनेत्री प्रियंका चोप्रासोबत (Actress Priyanka Chopra) ‘जंजीर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये (Bollywood) पाय रोवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला बॉलिवूडमध्ये यश मिळू शकले नाही. दरम्यान, राम चरण तेलगू फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात मोठे नाव आहे. मात्र, नुकताच प्रदर्शित झालेला ‘आरआरआर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ज्यावर संपूर्ण जगातील प्रत्येक पिढीचे प्रेम आहे. राम चरणच्या 37 व्या वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमधील नॅस्डॅक बिल्डिंगमध्ये शुभेच्छांचे डिजिटल पोस्टर्स लावण्यात आले होते. एक उत्कृष्ट चित्रपट अभिनेत्यासोबतच रामचरण एक यशस्वी बिझनेसमन देखील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम चरणची एकूण संपत्ती 1,250 कोटी रुपये आहे. राम चरण हा ट्रूजेट एअरलाइनचा संचालक आहे. 2013 मध्ये त्याने या एअरलाइन्सची सुरुवात केली होती.
अभिनेता राम चरण त्याच्या प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखला जातो. त्याने आपल्या अभिनयाने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. एक चांगला अभिनेता असण्यासोबतच राम चरण खूप चांगला डान्सर देखील आहे. राम चरणची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. अभिनय आणि नृत्याव्यतिरिक्त राम चरणला गाण्याची देखील आवड आहे. ‘तूफान’ या तमिळ चित्रपटासाठी त्याने एक गाणेही गायले आहे. याशिवाय त्यांनी दोन तमिळ चित्रपटांची निर्मितीही केली आहे. राम चरण आणि सुपरस्टार अल्लू अर्जुन चुलत भाऊ आहेत. यावरुन राम चरणची तुलना अल्लू अर्जुनशी अनेकदा झाली आहे. मात्र, दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकण्याचा प्रसंग येतो तेव्हा राम चरण कोणतीही कसर सोडत नाहीत.
राम चरणने जून 2012मध्ये अपोलो हॉस्पिटल्सचे कार्यकारी अध्यक्ष प्रताप रेड्डी यांची नात उपासना कामिनेनीशी लग्न केले. उपासना अपोलो चॅरिटीच्या उपाध्यक्षा आणि बी पॉझिटिव्ह मासिकाच्या मुख्य संपादक आहेत. राम चरण रॉयल लाईफस्टाईल जगतो. राम चरणचा हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथे बंगला आहे. या बंगल्याची किंमत सुमारे 38 कोटी असल्याचे सांगितले जाते. राम चरणला आलिशान गाड्यांची प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, रेंज रोव्हर ते ऑडी यांसारख्या लक्झरी कार आहेत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या