Ramesh Dev Passed Away : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ramesh Dev Passed Away: ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. अभिनेता अजिंक्य देव यांनी याबाबतची माहिती दिली आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Ramesh Dev Passed Away: ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचं हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. अभिनेता अजिंक्य देव यांनी याबाबतची माहिती दिली आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश देव (Ramesh Dev) यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. रमेश देव यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Also Read:
रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1929 कोल्हापुर येथे झाला. आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातून 1956 साली रमेश देव यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी मराठीसह अनेक हिंदी सिनेमांमध्येही आपल्या भूमिकेची छाप सोडली. सुरुवातीला त्यांना हिंदीत छोट्या भूमिका मिळाल्या. मात्र त्यानंतर त्यांना हिंदी सिनेमात सहकलाकाराचा भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ‘आनंद’ या चित्रपटातील भूमिकेमुळे ते ओळखले जात होते.
रमेश देव 1962 मध्ये अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांच्यासोबत लग्नबंधनात अडकले. या दोघांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केले. त्यांचे अनेक चित्रपट चांगलेच गाजले. रमेश देव यांनी काही दिवसांपूर्वीच 93वा वाढदिवस साजरा केला होता. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना अनेक चाहत्यांनी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या. मात्र त्यानंतर काही दिवसांनी आज रमेश देव यांनी जगाचा निरोप घेतला.त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या