मुंबई : रणवीर सिंग-दीपिका पादुकोण (Ranveer Singh-Deepika Padukone) यांची जोडी बॉलीवूडच्या सर्वात हॉट कपल्सपैकी एक मानली जाते. रणवीर आणि दीपिकाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मथळे बनवतात. रणवीर आणि दीपिका आपल्या विवाहित जीवनात खूप आनंदी आहेत हे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाहून कळते. एका मुलाखतीत रणवीर सिंगने दीपिका बद्दल एक खुलासा केला आहे.Also Read - Sara Ali Khan ने ब्लू कलर नेट साडी परिधान करून जिंकली चाहत्यांची मनं, तुम्हीही पाहा PHOTO

रणवीर सिंग म्हणाला की, दीपिकाने त्याला तीन आदेश दिले आहेत ज्यांचं पालन त्याने करणं गरजेचं आहे. रणवीरने सांगितले की, रात्री उशिरा त्याला घराबाहेर पडण्यास मनाई आहे. दुसरा म्हणजे काहीही न खाता घराबाहेर जाण्यास मनाई आहे आणि तिसरा आदेस म्हणजे कॉल मिस नाही झाला पाहिजे. रणवीरने सांगितले की मी हे तिन्ही आदेश फॉलो करतो. रणवीर सिंगने मुलाखतीतही सांगितले की दीपिका खूप घरगुती स्वभावाची आहे. ती घरात अगदी साध्या पद्धतीत वावरते. Also Read - Upasana Singh Birthday : दूरदर्शनवर वयाच्या 7 व्या वर्षीच सुरु केला होता अभिनय, असा आहे उपासना सिंह यांचा प्रवास

बॉलिवूडचीमधील पॉवर कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये इटलीच्या लेक कोमो ( Lake Como, Italy) येथे लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नातील काही न पाहिलेले फोटोज (Ranveer Singh- Deepika Padukone Unseen Wedding Pics) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आपण हे फोटो यापूर्वी पाहिले नसेल. या फोटोंमध्ये नवविवाहित जोडी पारंपारिक पोशाखात दिसत आहे. यातील एका फोटोमध्ये दीपिका आणि रणवीर लग्जरी बोटीवरून लग्नाच्या ठिकाणी येताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोंमध्ये दोघांनी हातात शॅम्पेनचा ग्लास घेतलेला दिसत आहे. Also Read - Malaika-Arjun Paris Vacation: प्रेमाच्या शहरात प्रियकरासोबत सुट्ट्या एन्जॉय करतेय मलाइका अरोरा, आयफेल टॉवरसमोर दिल्या रोमँटिक पोझ

हे फोटो त्यांच्या दक्षिण भारतीय शैलीतील लग्नातील आहेत. या जोडप्याने दोन वेगवेगळ्या शैलीतील लग्नसोहळे केले. यातील एक आनंद कारज सोहळा होता, तर दुसरा दक्षिण भारतीय शैलीतील लग्नसोहळा होता. या फोटोंमध्ये दोघेही क्रिम कलरच्या पारंपारिक वेशात दिसत आहेत. दोघांच्या लग्नाचे हे फोटो खूपच सुंदर आहे. या फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान, दीपिका आणि रणवीर क्रिकेट वर्ल्डकप विजयाच्या पार्श्वभूमीवर निर्मित आगामी चित्रपट ’83’ मध्ये एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, दीपिका शाहरुख खानसोबत देखील पठाण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.