Top Recommended Stories

Ranveer Singh Nude Photoshoot: इंदूरमध्ये लोक रणवीर सिंहसाठी जमा करत आहेत कपडे, न्यूड फोटोशूटविरोधात आंदोलन

Ranveer Singh Nude Photoshoot: रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटविरोधात इंदुरमध्ये आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी त्याला मानसिक रोगी म्हटले आहे.

Published: July 27, 2022 8:31 AM IST

By India.com News Desk | Edited by Mohini Vaishnav

इंदूरमध्ये लोक रणवीर सिंहसाठी जमा करत आहेत कपडे, न्यूड फोटोशूटविरोधात आंदोलन
इंदूरमध्ये लोक रणवीर सिंहसाठी जमा करत आहेत कपडे, न्यूड फोटोशूटविरोधात आंदोलन

Ranveer Singh Nude Photoshoot:अभिनेता रणवीर सिंह ( Ranveer Singh) सध्या त्याच्या न्यूड फोटोंमुळे चर्चेत आहे. त्याने पेपर मॅगझिनसाठी न्यूड पोज दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. त्याने सोशल मीडियावर न्यूड फोटोशूट (Ranveer nude photoshoot)शेअर करताच एकच गोंधळ उडाला होता. त्याने एका सुंदर तुर्की गालिच्यावर पोज दिल्या होत्या. अनेकांनी त्याचे कौतुक केले मात्र अनेक लोक त्याला अजुनही ट्रोल करत आहेत. दरम्यान देशात काही ठिकाणी रणवीरच्या फोटोशूटविरोधात आंदोलन (Protest against Ranveer)देखील करण्यात येत आहे. त्याच्यावर पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. आंदोलकांनी तर त्याला मानसिक रोगी देखील म्हटले आहे. आता मध्य प्रदेशचे सर्वात स्वच्छ शहर इंदूरमध्ये (indore)कचरा गोळा करण्याच्या पिशव्यांसह लोकांनी आंदोलन केलेय.

Also Read:

आंदोलक म्हणतात हा ‘मानसिक कचरा’

रणवीर सिंहचे न्यूड फोटोशूट हे आता राष्ट्रीय मुद्दा बनले आहे. इंदूरमध्ये या फोटोशूटविरोधात आंदोलन केले जातेय. शहरातील खासगी संघटनेकडून रणवीर सिंहसाठी कपडे दान अभियान सुरु करण्यात आले आहे. ‘बॉलिवूड खतरे मे है, मानसिक कचरा’ तसेच ‘तसेच माझे इंदुर मानसिक कचरा स्वच्छ करण्यासाठी देखील प्रतिबध्द आहे’ असे डोनेशन बॉक्सवर लिहिण्यात आले आहे. इंदुर येथील एनजीओचे हे अनोखे आंदोलन अनेकांना आवडले देखील आहे.

You may like to read

मुलांच्या भविष्यावर परिणाम

आंदोलकांचे म्हणणे आहे की रणवीर सिंहने ज्या पद्धतीने फोटोशूट केले आहे, त्याचा देशभरातून निषेध होत आहे आणि सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल केले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते नीरज याज्ञिक सांगतात की, इंदूरमध्ये रणवीर सिंहसाठी कपडे गोळा करण्यात आले आहेत. रणवीर सिंहच्या स्वस्त लोकप्रियतेसाठी मुलांच्या भविष्याशी खेळू दिले जाणार नाही. तो युथ आयकॉन असून लाखो तरुण त्याला पसंत करतात. रणवीर सिंहच्या फोटोशूटचा त्या तरुणांवर काय परिणाम होईल, त्यामुळे अशा प्रकारचे नग्नता खपवून घेतली जाणार नाही.

रणवीर विरोधात तक्रार

रणवीर सिंहला (Ranveer Singh Nude Photoshoot) न्यूड फोटोशूट करणे चांगलेच महागात पडलं आहे. रणवीरविरुद्ध एका सेवाभावी संस्थेने दिलेल्या तक्रारीवरून चेंबूर पोलिस स्टेशनमध्ये (Chembur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आलाय. रणवीर याने न्यूड फोटोशूट करून भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले आणि महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप (Mumbai Police) त्याच्यावर करण्यात आला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.