
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Rasik Dave death : मनोरंजन विश्वातून वाईट बातमी समोर येत आहे. टीव्ही अभिनेत्री केतकी दवे (Ketki Dave) हिचे पती रसिक दवे (Rasik Dave)यांचे निधन झाले आहे. ते 65 वर्षांचे होते. त्यांनी शुक्रवारी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. किडनी निकामी झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. ते जवळजवळ 2 वर्षांपासून डायलिसिसवर होते आणि त्यांना आठवड्यातून 3 वेळा रुग्णालयात जावे लागत होते. गेल्या 15 दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते, असे सांगण्यात येत आहे. रसिक यांनी अनेक गुजराती नाटक-चित्रपट आणि अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. महाभारत या मालिकेतील त्यांची नंदाची भूमिका देखील चांगलीच गाजली. तर पत्नी केतकीने क्यूंकी सास भी कभी बहू थी(Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi)सह अनेक टीव्ही मालिकांसह चित्रपटांमध्ये काम केले आहे. केतकी-रसिकला 2 मुले आहेत.
रिपोर्ट्सनुसार, रसिक दवे दोन वर्षांहून अधिक काळ मुंबईतील हॉस्पिटलमध्ये डायलिसिस घेत होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा डायलिसिससाठी हॉस्पिटलमध्ये जात असत. मात्र काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, तेथे उपचारादरम्यान काल रात्री त्यांचा मृत्यू झाला. रसिक दवे यांनी अनेक गुजराती नाटके आणि चित्रपटांमध्ये काम केले. अभिनयासोबतच ते दिग्दर्शक आणि निर्माताही होते. त्यांनी अनेक गुजराती नाटकांचे दिग्दर्शनही केले.
रसिक दवेंने अनेक हिंदी टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. सीआयडी, संस्कार धरोहर अपना की, महाभारत, एक महल हो सपनो का अशा अनेक टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी काम केले. त्यांची पत्नी केतकी दवे एक प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांनी अदालत, क्यूंकी सास भी कभी बहू थी, संजीवनी, कॉमेडी सर्कस, आहत, पवित्र रिश्ता, तमन्ना, टीव्ही बीवीब आणि मैं यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर ती अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली आहे. फलक, कसम, दिल, होगी प्यार की जीत, मन, आमदनी अठ्ठनी खर्चा रुपया, कितने दूर कितने पास, कल हो ना हो, परवाना, आय हेट लव्ह स्टोरीज, सनम रे यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या