Top Recommended Stories

Rekha Untold Story: शूटिंग सुरु असताना रेखा यांच्यासोबत झाले होते असं काही, अभिनेत्याने जबरदस्तीने...

'इन आँखों की मस्ती के... मस्ताने हजारों है...' असं म्हणत रेखा यांनी आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर केली. ती जादू आजही कायम आहे. अशा या प्रसिद्ध अभिनेत्रीचं बॉलिवूड करिअरसह खासगी आयुष्य देखील कायम चर्चेत राहिले आहे. रेखा अवघ्या 15 वर्षांच्या होत्या त्यावेळी एका चित्रपटातील दृश्यासाठी त्यांना अभिनेत्यानं बळजबरीनं किस (Kiss) केलं होतं.

Published: February 24, 2022 8:31 AM IST

By India.com News Desk | Edited by India.com News Desk

Rekha Untold Story: शूटिंग सुरु असताना रेखा यांच्यासोबत झाले होते असं काही, अभिनेत्याने जबरदस्तीने...

Rekha Untold Story : बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रेखा (Rekha) यांनी बहुविध भूमिका बॉलिवूडमध्ये (Bollywood) साकारल्या. ‘इन आँखों की मस्ती के… मस्ताने हजारों है…’ असं म्हणत रेखा यांनी आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर केली. ती जादू आजही कायम आहे. अशा या प्रसिद्ध अभिनेत्रीचं बॉलिवूड करिअरसह खासगी आयुष्य देखील कायम चर्चेत राहिले आहे. रेखा अवघ्या 15 वर्षांच्या होत्या त्यावेळी एका चित्रपटातील दृश्यासाठी त्यांना अभिनेत्यानं बळजबरीनं किस (Kiss) केलं होतं. इथं एका दृश्यामध्ये त्यांनी रेखा यांना किस करणं अपेक्षित होतं. पण, ते 5 मिनिटं होऊनही रेखा यांना किस करत राहले. हा प्रसंगाने रेखा यांना मोठा धक्का बसला होता. त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. ही बाब लैंगिक शोषणाचा एक प्रकार असल्याची चर्चा त्यानंतर झाली होती.

Also Read:

‘अनजाना सफर’ चित्रपटदरम्यान घडलं अनपेक्षित…

रेखा यांचा ‘अनजाना सफर’ (Anjana Safar) हा पहिला बॉलिवूड चित्रपट. अभिनेते विश्वजित यांच्यासोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली होती. रेखा यावेळी अवघ्या 15 वर्षांच्या होत्या. पण, सेन्सॉरमुळं त्यांचा हा चित्रपट 10 वर्षांनंतर प्रदर्शित झाला. असं म्हटलं जातं की, याच चित्रपटातील एका दृश्यासाठी त्यांना अभिनेत्यानं बळजबरीनं किस केलं होतं. इथं एका दृश्यामध्ये त्यांनी रेखा यांना किस करणं अपेक्षित होतं. पण, अभिनेत्याने 5 मिनिटे होऊनही रेखा यांना किस थांबविलं नव्हतं.

You may like to read

रेखा यांच्या डोळ्यात आले होते पाणी…

यासिर उस्मान (Yasser Usaman) यांच्या ‘रेखा : द अनटोल्ड स्टोरी’ (Rekha: The Untold Story) या पुस्तकानुसार ‘अनजाना सफर’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्याने 5 मिनिटं होऊनही रेखा यांना किस करणे थांबविलं नव्हतं. या प्रसंगामुळे रेखा यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. हा प्रसंग लैंगिक शोषणाचाच एक प्रकार असल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. रेखा यांना या दृश्याबद्दल काहीच माहिती नव्हती. आणि निर्मात्याने देखिल या दृष्याबाबत त्यांना कल्पना दिलेली नव्हती. हा सीन रेखा यांना त्रास देण्यासाठी मुद्दाम ठेवण्यात आला होता अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. सर्वकाही तयार होतं, दिग्दर्शकानं कॅमेरा रोलची ऑर्डर दिली आणि तेव्हाच विश्वजित एकाएकी रेखा यांना किस करु लागले. हे सर्व 5 मिनिटांपर्यंत सुरू राहिलं. रेखा यांना हा हादरा होता. कॅमेरा सुरुच राहिला, पण यादरम्यान दिग्दर्शकानं कट नाही म्हटलं.

अभिनेत्याने दिले होते स्पष्टीकरण…

अचानक झालेल्या या प्रकारामुळे रेखा रडतच होत्या. तिची मदत करण्या ऐवजी तिथं टाळ्या वाजवल्या होत्या. सेन्सॉरनं याच मुद्द्यावर हरकत व्यक्त केली होती. त्यानंतर हा वाद विकोपाला पोहोचला होता. अमेरिकेतील ‘लाईफ’ या मासिकातही याचा उल्लेख करण्यात आला होता. या दृश्यामध्ये आपली कोणतीही चूक नसल्याचं अभिनेत्याने स्पष्टीकरण देत सांगितलं होतं. आपण हे दिग्दर्शक राजा नवाथे यांच्या सांगण्यावरून केल्याचं त्यांनी सांगितलं. हे सर्व आपण आपल्या आनंदासाठी नव्हे, तर चित्रपटाची गरज म्हणून केल्याचं सांगितलं होत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 24, 2022 8:31 AM IST