Top Recommended Stories

RRR Box Office Collection: RRR चा बॉक्स ऑफिसवर धमाका; पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई

RRR Box Office Collection: पाहिल्यास दिवसात या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद लक्षात घेता आठवडाभरता हा चित्रपट बक्कळ कमाई करत मोठ मोठ्या चित्रपटांचा रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे. 

Updated: March 26, 2022 3:45 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

RRR box office
RRR Box Office Collection Day 8: SS Rajamouli’s Magnum Opus Runs Strong in The Second Week, Makes Rs 13.50 Crores in The Hindi Version

RRR Box Office Collection: ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस.एस. राजामौली ( SS Rajamouli ) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट RRR शुक्रवारी प्रदर्शित झाला. गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाची (Movie) प्रेक्षकांना प्रतीक्षा होती. प्रदर्शित होताच या चित्रपटाने धूम केली आहे. पाहिल्यास दिवसात या चित्रपटाने जबरदस्त कमाई ( RRR Collectionकेली आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद लक्षात घेता आठवडाभरता हा चित्रपट बक्कळ कमाई करत मोठ मोठ्या चित्रपटांचा रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे. ट्रेंड अनॅलिस्ट रमेश बाला यांच्या म्हणण्यानुसार चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 18 कोटी रुपयांची कमाई केली. तेलुगूमध्ये फिल्मने सर्व रेकॉर्ड तोडत 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

विदेशातही जोरदार कमाई

RRR या चित्रपटाने भारतातच नव्हे तर विदेशातही आपला डंका वाजविला आहे. या चित्रपट ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये देखील चांगली कमाई करत आहे. चित्रपटाने अमेरिकेतही बंप्पर कमाई करत 5 मिलियन डॉलर क्लबमध्ये एट्री केली आहे. चित्रपटाने अमेरिकेतील बॉक्स ऑफिसवर 4.5 मिलियन डॉलर कमाई केली आहे. यासह ट्रेंड अनॅलिस्ट तरण आदर्श यांच्या ट्वीट नुसार या चित्रपटाने अमेरिकाशिवाय युकेमध्ये 2.38 लाख युरोपेक्षा जास्त कमवई करत 2.40 कोटी रुपये आपल्या खात्यात जोडले आहे. तर नॉर्थ अमेरिका आणि कॅनडात 26.46 कोटींची कमाई केली आहे.

You may like to read

रिपोर्टनुसार या चित्रपटाने आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधून 120 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे आणि यासोबतच सर्वात हायेस्ट ओपनर्समध्ये हा चित्रपटाचा समावेश झाला आहे. तर तामिळनाडूमध्ये 10 कोटी, कर्नाटकमध्ये 14 कोटी, केरळमध्ये 4 कोटींची कमाई या चित्रपटाने केल्याचा अंदाज आहे. मात्र अद्यापही अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.  

बाहुबलीचा रेकॉर्ड तोडणार –

काही चित्रपट समिक्षकांनी अंदाज वर्तविला आहे की, दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर  RRR हा चित्रपट ‘बाहुबली 2’चा रेकॉर्ड तोडणार आहे.  या चित्रपटात राम चरण (Ram Charan) यांनी स्वातंत्र्यसैनिक ‘अल्लुरी सीताराम राजू’ ची भूमिका साकारली आहे. तर ज्युनियर एनटीआर याने ‘कोमाराम भीम’ची भूमिका साकारली आहे. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा प्रतिसाद लक्षात घेता हा चित्रपट ‘बाहुबली 2’चा रेकॉर्ड तोडणार असेच वाटत आहे. 

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.