Top Recommended Stories

RRR Online Leak: 'आरआरआर'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पण एचडी प्रिंटमध्ये लीक झाला चित्रपट

RRR Online Leak Full HD : साउथमधील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट 25 मार्चरोजी रिलीज झाला. त्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ज्युनियर एनटीआर, राम चरण या साउथमधील तगड्या स्टारकास्टसह या चित्रपटात बॉलिवूडमधील स्टाईल आयकॉन अजय देवगण आणि आलिया भट्ट यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत.

Updated: March 26, 2022 3:52 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

RRR Box Office Collection day 3 in hindi ready to collect crores competition from the kashmir files
RRR Box Office Collection day 3

RRR Online Leak Full HD : साउथमधील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली (S.S.Rajamouli) यांचा आरआरआर (RRR) हा चित्रपट 25 मार्चरोजी रिलीज झाला. त्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ज्युनियर एनटीआर (Jr NTR) , राम चरण (Ram Charan) या साउथमधील तगड्या स्टारकास्टसह या चित्रपटात बॉलिवूडमधील स्टाईल आयकॉन अजय देवगण (Ajay Devgn) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. मात्र या चिपटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण ‘आरआरआर’ रिलीज झाल्यानंतर काही तासातच चित्रपटाची एचटी प्रिन्ट ऑनलाइन लीक (RRR Online Leak) झाली आहे.

आरआरआर चित्रपट रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच लीक झाल्याने निर्मात्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. एचडीमधील आरआरआर इंटरनेटवर लीक झाला आहे. Filmyrap, Tamil Rockers सोबत MovieRulz च्या वेबसाईटवर RRR लीक झाली आहे. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा चित्रपट सिनेमागृहात पाहायला हवा, मोबाईलवरील पायरसी कॉपी पाहू नये अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अनेक पायरेटेड साईट्सवर हा चित्रपट उपलब्ध झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता त्याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवर होणार आहे.

You may like to read

View this post on Instagram

A post shared by RRR Movie (@rrrmovie)

एसएस राजामौली (S.S.Rajamouli) दिग्दर्शित ‘RRR‘ या चित्रपटाला काल आणि आज प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट बक्कळ कमाई करत आहे. अशा स्थितीत आता चित्रपट लीक झाल्याने निर्मात्यांकडून प्रेक्षकांना हा चित्रपट सिनेमागृहांत जाऊन पाहण्याचे आवाहन केले जात आहे.

‘आरआरआर’ चित्रपट (RRR Movie) ऑनलाइन लीक झाल्याच्या बातमीमुळे निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. सुमारे 350 कोटींमध्ये बनलेला मेगा बजेट चित्रपट काही तासांतच लीक झाल्याने बॉक्स ऑफिसच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो. गेल्या आठवड्यात राधे श्याम, द काश्मीर फाइल्स आणि बच्चन पांडे यांसारख्या मोठ्या चित्रपटांच्या लीकच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.